टोमॅटोने शतक गाठले; बाजार समितीत शंभरीपार, राज्यभर तुटवडा, श्रीरामपूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक ११० रुपये भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 08:36 AM2023-06-29T08:36:07+5:302023-06-29T08:36:40+5:30

Tomato price: रोजच्या आहारामधील प्रमुख भाज्यांमध्ये समावेश असलेल्या टोमॅटोचा राज्यभर तुटवडा निर्माण झाला आहे. एप्रिल व मे मध्ये बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना रडवणाऱ्या टोमॅटोला  विक्रमी दर मिळू लागला आहे.

Tomatoes reach a century; In the market committee, there is a shortage across the state, the highest price is 110 rupees in the Srirampur market committee | टोमॅटोने शतक गाठले; बाजार समितीत शंभरीपार, राज्यभर तुटवडा, श्रीरामपूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक ११० रुपये भाव

टोमॅटोने शतक गाठले; बाजार समितीत शंभरीपार, राज्यभर तुटवडा, श्रीरामपूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक ११० रुपये भाव

googlenewsNext

- नामदेव मोरे
नवी मुंबई  - रोजच्या आहारामधील प्रमुख भाज्यांमध्ये समावेश असलेल्या टोमॅटोचा राज्यभर तुटवडा निर्माण झाला आहे. एप्रिल व मे मध्ये बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना रडवणाऱ्या टोमॅटोला  विक्रमी दर मिळू लागला आहे. किरकोळ मार्केटमध्ये बाजारभाव ८० ते १०० पर्यंत पोहोचले आहेत. भाव वाढल्यामुळे शेतकरी खूश असून दुसरीकडे ग्राहकांना मात्र भाववाढीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. 

पाऊस सुरू झाल्यापासून राज्यभर भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव वाढू लागले आहेत. बाजारभाव वाढलेल्या वस्तूंमध्ये टोमॅटोचाही समावेश आहे. एक महिन्यात दर पाच पट वाढले आहेत. बुधवारी राज्यातील २४ बाजार समित्यांमध्ये ११७९ टन टोमॅटोची आवक झाली आहे. सर्वाधिक ५०४ टन आवक जुन्नर-नारायणगाव बाजार समितीमध्ये झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये २३१ टन आवक झाली आहे. राज्यात टोमॅटोला सर्वाधिक भाव श्रीरामपूर बाजार समितीमध्ये मिळाला आहे. ३० ते ११० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री झाली आहे. सोलापूरमध्ये ९ ते ८० रुपये, औरंगाबादमध्ये ५० ते ७० रुपये भाव मिळाला आहे. 

राज्यातील टाेमॅटोची एकूण आवक(टन)
    दिनांक    आवक
    २३ जून    १५४२
    २४ जून    १४८०
    २५ जून    ५३८
    २६ जून    ९०८
    २७ जून    ६००
    २८ जून    ११७९

पुढचे काही दिवस दर तेजीतच
मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटो ३५ ते ४५ रुपये किलो दराने विकला गेला आहे. पावसामुळे टोमॅटो खराब होत असल्यामुळे किरकोळ मार्केटमध्ये ७० ते १०० रुपये दराने विक्री होत आहे. काही दिवस टोमॅटाेचे दर तेजीत राहतील, असा  व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

रोजच्या आहारात टोमॅटोचा वापर
मुंबईकरांच्या आवडत्या पावभाजीसाठी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची गरज असते. याशिवाय हॉटेलसह घरांमध्येही सलॅड म्हणूनही टोमॅटोचा वापर केला जातो. विद्यार्थी व नोकरदारांच्या डब्यावरही टाेमॅटोच्या भाजीला पसंती दिली जाते.

Web Title: Tomatoes reach a century; In the market committee, there is a shortage across the state, the highest price is 110 rupees in the Srirampur market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.