शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

महासभेत गाजला मोकाट कुत्र्यांच्या हैदोसाचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:48 PM

कुत्र्याच्या निर्बीजीकरणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या; नगरसेवकांची मागणी

पनवेल : महिनाभरात पनवेल पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी २५ हून अनेकांना चावा घेतला आहे. निर्बीजीकरण बंद असल्याने कुत्र्यांची वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे. बुधवारी पनवेल महापालिकेच्या महासभेत भटक्या कुत्र्यांच्या विषयांचे पडसाद उमटले. या वेळी नगरसेवकांनी कुत्र्याच्या निर्बीजीकरणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली.राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित करीत लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती सभागृहात केली. घरातून बाहेर पडल्यावर प्रत्येक जण कुत्र्यांचा विषय आमच्यासमोर मांडतो. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे त्यांनी सुचवले.सहा महिन्यांत पनवेल पालिका क्षेत्रात १,२६६ जणांना श्वानदंश झाले आहे. काही संस्थांकडून पशूपक्ष्यांना खाद्य टाकण्यासाठी ठरावीक व्यक्तींना मानधन देण्यात येत असल्याचे नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी निदर्शनास आणून दिले. भाजप नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी मोबाइल टॉवर्सच्या कारवाईचा तपशील मिळण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी पालिका क्षेत्रातील अनधिकृत मोबाइल टॉवर्स विरोधात पालिकेने कारवाई तीव्र केली असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.विनापरवाना ९३ मोबाइल टॉवर पालिकेने सील केले आहेत. पालिका क्षेत्रात एकूण ३६३ अनधिकृत मोबाइल टॉवर्स आहेत. मात्र, काही मोबाइल टॉवर्स कंपन्यांनी कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिल्याने त्यांनी या वेळी सांगितले.पनवेल शहरातील अपूर्णावस्थेतील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांचे अपघाती निधन झाले. संबंधित रस्त्याचे काम अपूर्ण ठेवल्याने नगरसेविकेला आपला जीव गमवावा लागला. सुमारे दीड महिना होत आला तरी अद्याप याबाबत काहीच कारवाई झाली नसल्याने याबाबत नगरसेवक हरेश केणी यांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी संबंधित बिटकॉन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केली.प्रभाग समित्यांच्या सभापती व अधिकाऱ्यांच्या कामावर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी दिवंगत नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यपदी नगरसेविका अ‍ॅडव्होकेट नरेश ठाकूर तर महिला बाल कल्याणसमितीच्या सदस्यपदी नगरसेविका दर्शन भोईर यांची निवड करण्यात आली.मुख्यालयाचे नाव ‘स्वराज्य’पालिका मुख्यालय तसेच प्रभाग कार्यालयांना ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्याची संकल्पना आयुक्त गणेश देशमुख यांनी राबविली आहे. राज्यात अशाप्रकारची संकल्पना राबविणारी पनवेल ही पहिलीच महापालिका आहे. या विषयाला सभागृहात मंजुरी मिळाली. या अंतर्गत पनवेल महापालिकेच्या नूतन मुख्यालयाला स्वराज्य, महापौर निवासाला शिवनेरी, आयुक्त निवासाला राजगड व प्रभाग अ,ब,क,ड या कार्यालयांना विजयदुर्ग, जलदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग अशी नावे देण्यात आली आहेत.सीडीपीला मंजुरीपनवेल महापालिकेचा सीडीपी पालिकेने तयार केला आहे. शहराचे व्हिजन डॉक्युमेंट यामध्ये असणार आहे. या सिटी डेव्हलपमेंट प्लॅनलाही महासभेत मंजुरी मिळाली.जैवविविधता व्यवस्थापन समितीमहापालिका हद्दीतील जैवविविधता व्यवस्थापन समिती गठित करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. महापौर या समितीचे अध्यक्ष असणार असून या समितीद्वारे पालिका क्षेत्रातील दुर्मीळ वनस्पती, दुर्मीळ प्राण्यांच्या प्रजाती, भाताच्या जातीची नोंदणी करून यासंदर्भात शासनाच्या नगरविकास खात्याला माहिती देण्यात येणार आहे. दुर्मीळ वनस्पतीचे जतन करण्यासाठी दुर्मीळ वनस्पतींचे एकउद्यान तयार करण्याचा मानस या समितीचा असणार आहे.