दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:23 PM2019-05-19T23:23:39+5:302019-05-19T23:23:48+5:30

वृद्धांना अटक : दिवा, दिघा परिसरातील घटना

Torture on two minor girls | दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नवी मुंबई : दिवा व दिघा परिसरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये वृद्ध व्यक्तींचा समावेश असून त्यांना अटक केली आहे. ओळखीचा फायदा घेऊन त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.


दिवा येथील गुन्ह्यात अटक केलेल्या वृद्धाचे नाव तुलसीदास वाकड (७६) असे आहे. त्याने राहत्या परिसरातील नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले होते. सदर मुलगी चौथीत शिकणारी असून ती इमारतीखाली खेळत असताना वाकड याने तिच्याकडे परीक्षेत मिळालेल्या गुणाबाबत चौकशी केली. या वेळी मुलीने जास्त गुण मिळाल्याचे सांगताच तिला पेढा देण्याच्या बहाण्याने इमारतीच्या आडोशाला नेऊ न अश्लील चाळे केले. याबाबत तिने घरच्यांना सांगितले असता, घरच्यांनी इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही तपासले.

त्यामध्ये प्रकार उघड झाल्यानंतर शनिवारी पोलिसांकडे तक्रार केली असता, गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ११ वर्षीय मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मदन पासवान (५५) याला अटक केली आहे. तो दिघा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीचा सुरक्षारक्षक आहे. परिसरात राहणारी पीडित मुलगी कंपनीच्या समोरून जात असताना त्याने काही कामानिमित्ताने तिला बोलवले. त्यानंतर लगतच्या बंद कंपनीमध्ये नेऊन तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.

पार्श्वभूमीचा तपास
कंपनीतून त्या मुलीने पळ काढून घडलेल्या प्रकाराबाबत वडिलांना सांगितले. त्यानुसार तिच्या कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली असता, पासवान याला अटक करण्यात आली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, अटकेत असलेल्या वृद्धांनी यापूर्वीदेखील असे काही प्रकार केले आहेत का? याचीही चौकशी सुरू आहे.

Web Title: Torture on two minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.