गवळीदेव धबधब्याला पर्यटकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:26 AM2018-06-27T02:26:29+5:302018-06-27T02:26:34+5:30

महापे-ठाणे एमआयडीसी मार्गावर असलेला गवळीदेव धबधब्याची नोंद मुंबई, ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या नकाशावरही आहे.

Tourist choices for Gawli Devi Falls | गवळीदेव धबधब्याला पर्यटकांची पसंती

गवळीदेव धबधब्याला पर्यटकांची पसंती

Next

अनंत पाटील
नवी मुंबई : महापे-ठाणे एमआयडीसी मार्गावर असलेला गवळीदेव धबधब्याची नोंद मुंबई, ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या नकाशावरही आहे. हिरव्यागार गर्द झाडाझुडपाच्या डोंगराच्या कुशीत लपलेल्या या धबधब्यावर पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात. डोंगर माथ्यावरून कोसळणाऱ्या पांढºया शुभ्र धबधब्याचा आनंद लुटण्याची एक वेगळीच मौज येथे पर्यटकांना येते. या ठिकाणी येणाºया पर्यटकांत आबालवृध्दांची संख्या लक्षणीय असते. विशेषत: नवी मुंबईसह, मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील पर्यटकांकडून गवळीदेव धबधब्याला अधिक पसंती मिळत आहे.
गवळी देव डोंगरावर गुरे चरण्यासाठी गुराखी (गवळी) जात असे. मात्र वाट चुकलेली गुरे मिळाली नाहीत तर गवळी देवाचे नाव घेताच आपोआप घरी यायची, अशी येथील आख्यायिका आहे. उंच डोंगरावरून कोसळणाºया पाण्याच्या प्रवाहाचे सर्वांनाच आकर्षण असते. या धबधब्यावर जाताना खवय्यांनी मात्र पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे. कारण तेथे हॉटेल किंवा पिण्याच्या पाण्याची अजिबात सोय नाही. घणसोली स्टेशन आणि रबाले रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर हा धबधबा आहे. महापे बिझनेस पार्कपासून केवळ दोन कि.मी.च्या अंतरावर असलेल्या या धबधब्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे.
या धबधब्याला जायची वाट ही घनदाट जंगलातूनच जाते. याठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनखात्याचे वनरक्षक तसेच रबाले एमआयडीसी पोलीस यंत्रणा तैनात आहे. येथे मद्यपान करण्यास सक्त मनाई असल्यामुळे येथे जाताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वनखात्यामार्फत या गवळीदेव डोंगराची देखभाल केली जाते. पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी दिशा दाखविणारे फलक लावले आहेत. येथे जाताना पर्यटकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव पायात गमबूट किंवा मजबूत शूज वापरणे आवश्यक आहे. या डोंगराला जाताना नागमोडी दगडांच्या पायºयांचा कच्चा रस्ता आहे. लहान मुले तसेच वयस्कर लोकांनी चढताना सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. या डोंगरावर अनेक जातीचे विषारी आणि बिनविषारी साप आहेत. विविध प्रकारचे पक्षी तर रानटी डुकरे ,ससे, मुंगुस, वानरे, आणि अन्य प्राणी येथे आढळून येतात.
गवळीदेव डोंगराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासंदर्भात अलीकडेच महापालिकेने ठराव पारित केला आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी महिनाभरापूर्वी या स्थळाचा दौरा करून पाहणी केली. या ठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध करण्यासाठी खासदार निधी देण्याचे आश्वासन त्यांनी घणसोली ग्रामस्थांना दिले आहे. या डोंगरावर नानाविध आयुर्वेदिक वनौषधी तसेच विविध फळा-फुलांची झाडे आहेत. त्याचे जतन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली आहेत.

गवळीदेव डोंगराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासंदर्भात अलीकडेच महापालिकेने ठराव पारित केला आहे.
या डोंगरावर नानाविध आयुर्वेदिक वनौषधी तसेच विविध फळा-फुलांची झाडे आहेत. त्याचे जतन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली आहेत.
या धबधब्याला जायची वाट ही घनदाट जंगलातूनच जाते. याठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनखात्याचे वनरक्षक तसेच रबाले एमआयडीसी पोलीस तैनात आहे.

Web Title: Tourist choices for Gawli Devi Falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.