शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

चिरनेरच्या मातीच्या भांड्यांची पर्यटकांना भुरळ, व्यावसायिकांना सुगीचे दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 9:28 PM

मातीच्या भांड्यांची  मागणी वाढली असून व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.

मधुकर ठाकूर -

उरण : चिरनेरच्या महागणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सध्या तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या मातीच्या भांड्यांची भुरळ घातली आहे. त्यामुळे मातीच्या भांड्यांची  मागणी वाढली असून व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.

    चिरनेर ऐतिहासिक  गावात कुंभार समाजाची ३२ कुटुंब  पिढ्यानपिढ्या वास्तव करत आहेत.या समाजाचे उदरनिर्वाह मुख्य साधन म्हणजे शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविणे आणि नागरीकांना संसारासाठी आवश्यक असणारी शेत जमिनीतील मातीपासून खापरी,मटन किंवा मासळी बनवायला तवा, जोगळ्या,भीन,मडकी आदी विविध प्रकारची भांडी बनविणे हा प्रमुख व्यवसाय आहे.परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हळूहळू मातीच्या भांड्याची मागणी कमी कमी होत गेल्याने कुंभार समाजांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यानंतरही येथील कुंभार समाजाने पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय टिकवण्यासाठी, वाढवण्याची धडपड सुरूच ठेवली आहे.

    सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात घरगुती गॅस, विद्युत शेगड्यांवर तसेच स्टील अथवा अन्य धातुच्या भांड्यात अन्न पदार्थ शिजवले जातात.मात्र असे शिजवलेले अन्न हे शरीराला ऊर्जा देणारे नसल्याने चविष्ट नसल्याचे सांगितले जात आहे.मात्र शहरी भागात कमी जागेत मातीची चुल,मातीची भांडी ठेवण्यात अनंत अडचणी येतात.त्यामुळे शहरात तरी मातीच्या भांड्यांचा वापर फारसा केला जात नाही.

 मात्र चूलीवर, मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्न पदार्थ  रुचकर लागते.तसेच वाढत्या उष्णतेत घागर अथवा माठ, मडक्यातील थंडगार पाणी गारवा देणारे ठरते.त्यामुळे शहरी असो की ग्रामीण दोन्ही भागातील नागरिकांचा कळ मातीच्या भांड्यांकडे आहे.तरी काही जण घरातील शोभा वाढविण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो.त्यांना आकर्षक,सुबक रंगरंगोटी करून दिवाणखाना, शोकेसमध्ये सजविण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जात आहे.

  ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चिरनेर येथील श्री महागणपती देवस्थानाच्या भेटीला, दर्शनासाठी शेकडो हौशी पर्यटक  मुंबई, नवीमुंबई, ठाणे,पनवेल परिसरातुन येतात.दररोज येणाऱ्या अशा शेकडो हौशी पर्यटकांना सध्या चिरनेर येथील मातीच्या भांड्यांची पर्यटकांना भुरळ घातली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिरनेरच्या मातीच्या भांड्यांच्या खरेदीसाठी हौशी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.परिणामी चिरनेरच्या कुभारांनाही सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.

परिसरात येणाऱ्या हौशी पर्यटकांचा कल चिरनेरच्या मातीच्या भांड्यांची खरेदी करण्याकडे वाढला आहे. पर्यटकही मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांना पसंती दर्शवित आहेत.त्यामुळे येथील व्यावसायिकांना चांगले दिवस येऊं पाहात आहे.मात्र पारंपारिक कला जोपासण्यासाठी कुंभार समाजाला शासनाची मदत आवश्यक असल्याचे  व्यावसायिक नंदकुमार चिरनेरकर याचं म्हणणं आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईtourismपर्यटन