पर्यटक, तरुणाईसाठी नवे डेस्टिनेशन

By Admin | Published: July 3, 2017 06:41 AM2017-07-03T06:41:42+5:302017-07-03T06:41:42+5:30

पावसाळा सुरू झाला की, तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. धबधबे, धरणे, बीच आदी स्थळांना भेट देऊन मित्रमंडळींबरोबर

Tourists, new destinations for youth | पर्यटक, तरुणाईसाठी नवे डेस्टिनेशन

पर्यटक, तरुणाईसाठी नवे डेस्टिनेशन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : पावसाळा सुरू झाला की, तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. धबधबे, धरणे, बीच आदी स्थळांना भेट देऊन मित्रमंडळींबरोबर मौजमजा करण्याची नशा कुछ औरच असते. त्यासाठी आठवड्यातील एखाद दिवशीचा सुट्टीचा निखळ आनंद लुटण्यासाठी अशा निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मौजमजा करण्याचा ट्रेड सध्या तरुणाईत चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे उरण परिसरातील आक्कादेवी, पुनाडे, रानसई आदी धरणे आणि पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणाऱ्या पीरवाडी बीचवर सध्या तरुणाईची गर्दी वाढू लागली आहे.
मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर उरण वसले आहे. द्रोणागिरीच्या कुशीत आणि निसर्गरम्य सान्निध्यात वसलेल्या उरणची बातच कुछ और आहे. द्रोणागिरीच्या पायथ्याशी असलेले पीरवाडी बीच म्हणजे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षक डेस्टिनेशन बनले आहे. समुद्राच्या लाटांचे पाणी किनाऱ्यावर आदळल्यानंतर त्याचे तुषार अंगावर झेलण्याची मजा काही वेगळीच असते. त्यात आता बीचवरून दिसणारा अथांग समुद्र आणि समुद्राच्या लाटांच्या आकर्षक तांडवाचे दृश्य कॅमेरा, मोबाइलमध्ये चित्रित करण्याचीही पर्यटकांमध्ये चांगलीच चढाओढ लागलेली असते. त्यामुळे पीरवाडी बीच आता सेल्फी पॉइंट म्हणूनही आता उदयास येऊ लागला आहे. त्यामुळे पावसाळ्यातच नव्हे, तर वर्षभरातील इतर मोसमातही तरुणाईचे डेस्टिनेशन बनलेल्या पर्यटकांची पीरवाडी बीचवर चांगलीच गर्दी उसळलेली असते.


गाढेश्वर, मोरबे धरणांवर पर्यटकांची धमाल

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्या-नाले भरले आहेत. पनवेल परिसरातील गाढेश्वर, मोरबे धबधबा ओसंडून वाहू लागल्याने रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने मिळेल त्या वाहनाने पर्यटक या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आले होते.
पावसाळ्यात गाढेश्वर धरण परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावतो. गेल्या आठवड्यात या परिसरातील पाण्यात बुडून मुंबई परिसरातील मामा-भाचे यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शनिवार, १ जुलै रोजी चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. रविवारीही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त अपेक्षित होता. मात्र, दुपारचे २ वाजून गेले तरीदेखील या ठिकाणी पोलिसांचा पत्ता नव्हता. त्यामुळे दुपारच्या वेळी पर्यटकांनी गाढेश्वर व मोरबे धरणातील परिसराचा आनंद लुटला.
वाजेजवळ शनिवारी पोलीस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी शेकडो पर्यटकांना माघारी पाठवले. रविवारीही पोलीस बंदोबस्त असेल या भीतीने सकाळी धरणाकडे जाणाऱ्यांची गर्दी कमी होती. मात्र, पोलीस बंदोबस्त नसल्याने शेकडोंच्या संख्येने पर्यटक या परिसरात दाखल झाले. मोरबे धरण ओसंडून वाहू लागलेले आहे, तरीदेखील काही उत्साही तरु ण खाली उतरले होते. दुपारी २.३०च्या सुमारास पोलीस पोहोचल्याने त्यानंतर पर्यटकांना बाहेर काढले.

Web Title: Tourists, new destinations for youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.