माथेरानमध्ये शासकीय कामांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर सुविधा

By admin | Published: May 10, 2017 12:16 AM2017-05-10T00:16:31+5:302017-05-10T00:16:31+5:30

येथील काही कामे करावयाची झाल्यास सनियंत्रण समितीला विचारणा केल्याशिवाय कुठलीही कामे मार्गी लागत नव्हती.

Tractor facility for government work transport in Matheran | माथेरानमध्ये शासकीय कामांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर सुविधा

माथेरानमध्ये शासकीय कामांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर सुविधा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : येथील काही कामे करावयाची झाल्यास सनियंत्रण समितीला विचारणा केल्याशिवाय कुठलीही कामे मार्गी लागत नव्हती. काही वर्षे ही समिती अस्तित्वात नसल्याने अनेक विकासकामे प्रलंबित राहिली आहेत. पुन्हा ही समिती आपल्या पदावर येऊन कार्यरत झाल्याने शनिवारी येथे विशेष बैठकीचे आयोजन नगरपालिकेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी माथेरानमध्ये जरी मोटार वाहनांस बंदी असली तरीसुद्धा येथील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपयुक्त सोयी-सुविधा देणे शासनाला आता क्र मप्राप्तच झाल्यामुळे तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची खबरदारी घेऊनच येथे गावात अंतर्गत शासकीय कामांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर सुविधा पुरविण्यासाठी सनियंत्रण समितीने तत्त्वत: मान्यता दिल्यामुळे अनेक समस्या निमित्ताने मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच यासाठी नगरपालिकेने ठराव केलेला आहे.
सनियंत्रण समितीने येथील एकंदरीतच भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन नेहमीच उद्भवणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिल्यामुळे येथील काही अंशी का होईना आगामी काळातच हे पर्यटनस्थळ विकासाच्या वाटेवर दिसणार असल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त नगरपालिकेस वाहतुकीसाठी एक कोटी रु पये खर्च होतात. ट्रॅक्टरमुळे ही एक कोटी रु पयांची बचत होणार आहे. हा पैसा अन्य ठिकाणी विकासासाठी वापरण्यात येईल, याच माध्यमातून अन्नधान्य, दूध, भाजीपाला, शासकीय साहित्य, कचरा वाहतूक तसेच अत्यावश्यक साहित्याची वाहतूक केली जाणार आहे.
येथील घोड्यांच्या लीदमिश्रित धुळीने सर्वत्र मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. याचा नाहक त्रास येथील दुकानदार,व्यावसायिक निमूटपणे सहन करीत आहेत. यासाठी मुख्य रस्ता असणाऱ्या टपाल पेटी नाका ते रिगल हॉटेलपर्यंतच्या महात्मा गांधी मार्गावरून घोड्यांना पूर्णत: बंदी करण्याच्या निर्णयाला सुद्धा तत्त्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ई-रिक्षासंदर्भात पुढील महिन्यात होणाऱ्या विशेष सभेत चर्चा करण्यात येणार आहे. माथेरानला नव्या युगात नेण्यासाठी महत्त्वाकांक्षी निर्णयांना तत्वत: मान्यता मिळाल्यामुळे आणि येथील एकंदरीतच परिस्थितीचे गांभीर्यही लक्षात घेऊनच अनेक विषयांना मार्गी लावण्यासाठी या समितीने सकारात्मकता दाखवल्यामुळे पर्यटनवृद्धी होऊन सर्वांच्या रोजगारात भर पडणार आहे. भविष्यात हे पर्यटनस्थळ देखील अन्य पर्यटनस्थळांच्या बरोबरीने विकासाच्या वाटेवर जाणार आहे.एकंदरीतच यावेळेस सनियंत्रण समितीने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सकारात्मकता दाखवली आहे, यामुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळेस सनियंत्रण समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा सत्कार नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधर, गटनेता प्रसाद सावंत, मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप यांच्या हस्ते करण्यात आला. या विशेष बैठकीसाठी समितीचे चेअरमन वासुदेव गोरडे, सचिव शीतल तेली- उगले आदी उपस्थित होते.

Web Title: Tractor facility for government work transport in Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.