शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रेशनवर तूरडाळ विकण्यास दुकानदार संघटनेचा विरोध, १ आॅगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा

By admin | Published: July 06, 2016 8:12 PM

रेशन दुकानांमधून तूरडाळ विक्री करण्याच्या शासन निर्णयास मुंबई रेशन दुकानदार संघटनेने कडाडून विरोध केला आहे. यासंदर्भात संघटनेसोबत कोणतीही चर्चा केली नसल्याचा रोषही

चेतन ननावरे

मुंबई, दि. ६ : रेशन दुकानांमधून तूरडाळ विक्री करण्याच्या शासन निर्णयास मुंबई रेशन दुकानदार संघटनेने कडाडून विरोध केला आहे. यासंदर्भात संघटनेसोबत कोणतीही चर्चा केली नसल्याचा रोषही संघटनेने व्यक्त केला आहे. शिवाय गेल्या २ वर्षांपासून प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने १ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही संघटनेचेअध्यक्ष नवीन मारू यांनी दिला आहे.

लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेत मारू म्हणाले की, सरकारने १२० रुपये किलो दराने तूरडाळ विक्री करण्याची घोषणा केली. मात्र त्यामागे प्रति किलो किती रुपयांचे अनुदान असेल, याची माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे १२० रुपये किलो दराने आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान तूरडाळ विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. संघटनेतीलदुकानदार स्वत: ११० ते ११५ रुपये प्रति किलो रुपये दराने तूरडाळ विक्री करू शकतात. त्यामुळे १२० रुपये प्रति किलो दराने डाळ विक्री करण्यामागील उद्दीष्ट काय? याचा खुलासा संघटनेने मागितला आहे.

डोअर डिलीव्हरी योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याची मागणी सातत्याने दुकानदार संघटना करत असल्याचे मारू यांनी सांगितले. ते म्हणाले की, दुकानदारांच्या कमिशनच्या मुद्द्यावरही सरकार केवळ आश्वासने देत आहे. परिणामी आॅगस्ट महिन्यापासून धान्याचे मागणीपत्र (इंडेन्ट) रेशनिंग कार्यालयात भरून त्यासाठीचे पैसेही दुकानदार भरतील. मात्र गोदामातील माल दुकानदार उचलणार नाहीत. १ आॅगस्टपासून मुंबईसह राज्यातील सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे..........................राज्यव्यापी सभा मुंबईत१ आॅगस्टपासून होणाऱ्या बेमुदत संपाची व्यूहरचना करण्यासाठी लवकरच मुंबईत राज्यव्यापी सभा होणार असल्याचे संघटनेने सांगितले. या सभेमध्ये मुंबईतील हजारो दुकानदारांसोबत राज्य कार्यकारिणी आणि प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित असतील. सभेमध्येच राज्यव्यापी बेमुदत बंदची घोषणा केली जाईल. सभेबाबतची संपूर्ण माहिती दुकानदारांना व्हॉट्सअ‍ॅप आणि प्रसारमाध्यमांद्वारे कळवणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले............................तर पामतेल प्रति लीटर ५५ रुपयांनी विकूरेशनिंग दुकानदार संघटनेने मार्च ते मे महिन्यादरम्यान रेशन पाम तेल नावाने पामतेल प्रति लीटर ५५ रुपये दराने विकून दाखवले. मात्र आत्ता पामतेलचा दर प्रति लीटर ६० रुपये आहे. रेशन दुकानदारांना पामतेलवरील व्हॅट माफ केल्यास पुन्हा रेशन दुकानांतून प्रति लीटर ५५ रुपयांहून कमी दराने पामतेल विक्री करू, अशी घोषणाही संघटनेने केली आहे............................नेमकी मिठाई कोणाला?सणासुदीच्या काळात मिठाईसाठी लागणाऱ्या डाळीचे भाव गगनाला भिडण्याची भीती व्यक्त करत सरकारने तूरडाळ १२० रुपये प्रति किलो दराने विकण्याची घोषणा केली.   मात्र मिठाई तयार करण्यासाठी आवश्यक हरभऱ्याची डाळ स्वस्त दराने विकण्याऐवजी तूरडाळ विकून कोणाला मिठाई मिळणार आहे? असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. वाहतुकदारांनी १५ दिवसांचा संप पुकारला, त्यावेळी बाजारात साखरेची किंमत दुप्पट झाली होती. अशा परिस्थितीतही संघटनेने आहेत्या दरातच साखर उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे संघटनेला विश्वासात घेतल्याशिवाय तूरडाळ किंवा अन्य कोणत्याही प्रकारची डाळ विकणार नसल्याची भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे.