शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

नवी मुंबई विमानतळाची वाहतूक होणार सुसाट; गाढी नदीवर २ पूल, २१६ कोटींचा खर्च

By नारायण जाधव | Published: October 29, 2022 5:22 PM

नवी मुंबई विमानतळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून, मुंबई विमानतळावरील प्रवासी आणि कार्गो वाहतूक कमी करण्यासाठी ते बांधण्यात येत आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू असून, ते पूर्ण होण्याआधीच या विमानतळास रस्ते, रेल्वे आणि जलवाहतुकीने जोडण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून विमानतळाच्या पूर्व भागात गाढी नदीवर दोन पूल बांधण्यात येणार आहेत. या पुलांवर २१६ कोटी रुपये सिडको खर्च करणार आहे. यामुळे विमानतळाकडे पूर्वोत्तर भागाकडे जाणारी रस्ते वाहतूक सुसाट होण्यास मदत होणार आहे.

नवी मुंबई विमानतळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून, मुंबई विमानतळावरील प्रवासी आणि कार्गो वाहतूक कमी करण्यासाठी ते बांधण्यात येत आहे. या विमानतळासाठी लागणारी ११६० हेक्टर जमीन सिडकोने विकसकास पूर्णत: हस्तांतरित केली आहे. केवळ सिडकोच नव्हे, तर या विमानतळाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक सुसह्य व्हावी, यासाठी एमएमआरडीए, एमएसआरडीसी, रेल्वे विकास महामंडळ, मेरी टाईम बोर्ड या सर्व संस्था झटत आहेत.

रस्ते, रेल्वे, जलवाहतुकीने जोडणारमुंबईकरांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच पोहोचता यावे, यासाठी एमएमआरडीएने आधीच न्हावा-शेवा ते शिवडी या सी लिंकचे काम वेगाने सुरू केले आहे. शिवाय चिर्ले येथे हा रस्ता विमानतळासह मुंबई-पुणे महामार्गासह मुंबई-गोवा महामार्गास जोडण्यासाठी २६४९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत; तर दुसरीकडे सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथे ७०० कोटींच्या तिसऱ्या खाडीपुलाच्या कामानेही वेग घेतला आहे. तसेच कोकणसह पश्चिम उपनगरांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडणाऱ्या विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय धरमतर खाडीवर रेवस ते करंजा खाडीपूल बांधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नजिकच्या काळात पनवेल-सीएसटी लाेकलसह मेट्रोनेही जोडण्याचा शासनाचा मानस आहे. तसेच मुंबई-नवी मुंबई-ठाणे-मीरा-भाईंदर-विरार-कल्याण हा परिसर जलवाहतुकीद्वारे विमानतळास जोडण्यात येणार आहे.

पूर्वोत्तर कनेक्टिव्हिटी होणार मजबूतयानंतर आता नवी मुंबई विमानतळाच्या पूर्वोत्तर भागातील कनेक्टिव्हिटी आणि मजबूज व्हावी, यासाठी गाढी नदीवर बी-४ आणि बी -५ हे दाेन पूल बांधण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. या पुलांवर २१६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामुळे पनवेलसह मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवासह कल्याण-डोंबिवली, कर्जत परिसरातून ये-जा करणारी रस्ते वाहतूक आणखी सुसाट होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ