खाडीपुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 01:50 AM2019-11-08T01:50:12+5:302019-11-08T01:50:28+5:30
टोल नाक्यावरील प्रकार : वाशी ते मानखुर्ददरम्यान वाहतूक विस्कळीत : ठेकेदाराचेही दुर्लक्ष
नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे वाशी प्लाझा ते मानखुर्ददरम्यान वारंवार वाहतूककोंडी होत आहे. कोंडी सोडविताना पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुरुस्तीचे काम करताना ठेकेदारांनीही ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
वाशी खाडी पूल क्रमांक २ वरील पृष्ठभागाच्या नूतनीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सुरू आहे. १ नोव्हेंबरला सुरू झालेले हे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत. मुंबईकडे जाणारी एक मार्गिका बंद करण्यात आली आहे. वाशीच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरील एक लेन मुंबईत जाणाºया वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. दुसरी लेन वाशीकडे येणाºया अवजड वाहनांसाठी उपलब्ध करून दिली आहे. जुन्या खाडीपुलाचा वापर हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे. टोलनाक्यावरून मुंबईकडे जाताना व मुंबईवरून वाशीकडे येताना टोल नाक्यावर वारंवार वाहतूककोंडी होत आहे. येथून वाहतूक योग्य मार्गिकेवर पाठविताना वाहतूक पोलिसांनाही कसरत करावी लागत आहे. सकाळी व सायंकाळी ठेकेदाराने कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या हातामध्ये परावर्तक लाईट असलेली काठी दिलेली आहे. परंतु अनेकांकडे परावर्तक जॅकेट नसते. यामुळे अपघात होऊन हे कर्मचारीही जखमी होण्याची शक्यता आहे. खाडीपुलावरील स्थितीची माहिती दोन्हीकडून ये - जा करणाºया वाहनधारकांना मिळेल अशा प्रकारचे सूचना फलक योग्य पद्धतीने लावलेले दिसत नाहीत. यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. दोन महिने दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर वाहतूकदार व प्रवाशांची गैरसोय सुरूच राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील वाहनांची सर्वाधिक गर्दी असलेल्या महामार्गांमध्ये सायन - पनवेलचा समावेश आहे. या रोडवरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शासनाने महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुंदीकरणाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगून २०१५ मध्ये खारघर टोल नाका सुरू केला आहे. टोल सुरू होऊन चार वर्षे झाल्यानंतरही अद्याप संपूर्ण काम झालेले नाही.
वाशी प्लाझा ते टोल नाक्यादरम्यान मुंबईकडे जाणाºया मार्गिकेचे काँक्रिटीकरण सद्य:स्थितीमध्ये सुरू केले आहे. या कामामुळे सकाळी व सायंकाळी या ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. या ठिकाणी पुरेशा प्रमाणात परावर्तक पट्ट्या लावण्यात आलेल्या नाहीत. गर्दीच्या वेळी ठेकेदार कर्मचारी तैनात करीत नसल्यामुळे सर्व भार वाहतूक पोलिसांवर पडू लागला आहे. वाशी गावाजवळ रोडवरच नादुरुस्त वाहने उभी करून दुरुस्ती केली जात आहे.
रुंदीकरणाची रखडपट्टी थांबवावी
सायन - पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम २०१५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. पावसाळ्यात खड्डे पडणाºया लेनचे काँक्रिटीकरण केले जात आहे. वाशी, शिरवणे व इतर ठिकाणी वारंवार खड्डे पडत आहेत. भुयारी मार्गांचे काम पूर्ण झालेले नाही. वाशी गावाकडे जाणाºया भुयारी मार्गाजवळील लेनचे काम अद्याप सुरूही झालेले नाही.
दोन महिने सुरू राहणार दुरुस्ती
च्वाशी खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम १ नोव्हेंबरला सुरू केले आहे. एका आठवड्यामध्येच वाहतुकीचा बोजवारा उडू लागला आहे. दुरुस्तीचे काम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
च्योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर प्रवाशांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. याशिवाय वाशी एक्झिबिशन सेंटर ते टोल नाक्यापर्यंतच्या लेनचे काँक्रिटीकरण करण्याचे कामही सुरू आहे. तेळी वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.