नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 03:12 AM2019-09-30T03:12:25+5:302019-09-30T03:12:45+5:30

जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.

Traffic congestion in Raigad, including Navi Mumbai, calls for agitation from Guru War | नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक

नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक

Next

नवी मुंबई - जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. तसेच मालवाहू वाहनांना मुख्य मार्गावर प्रवेश बंदी, नो एंट्री, दंडात्मक कारवाई होत असल्याने वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नवी मुंबई व रायगडमधील वाहतूक संघटना एकत्र आल्या असून, अन्यायकारक प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी गुरु वार, ३ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरावरून मालाची वाहतूक करण्यासाठी राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातून जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. जेएनपीटी बंदराकडे जाणाºया रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी सारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत. वाहतूकदारांना उद्भवणाºया विविध अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सानपाडा येथील केमिस्ट भवन येथे नवी मुंबई आणि रायगडमधील वाहतूकदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तोपर्यंत वाहने रस्त्यावर न काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रमुख मागण्यांमध्ये प्रामुख्याने वाहतूककोंडी कमी करण्याकरिता रस्त्यांची दुरु स्ती तसेच सर्व्हिस रोडची कामे पूर्ण करून तो मार्ग स्थानिक व प्रवासी वाहने यांना उपलब्ध करून द्यावा. जेएनपीटीपासून १०० किलोमीटर अंतरापर्यंत सर्व रस्ते सुव्यवस्थित दर्जेदार असावेत. शिळफाटा-महापे, जेएनपीटी परिसरात लावण्यात आलेली प्रवेशबंदी काढून रस्ते पूर्ववत करण्यात यावेत. जेएनपीटी परिसरातील राज्य महामार्ग क्र ५४, राष्ट्रीय महामार्ग ४ बी, गव्हाण-दिघोडे या तिन्ही रस्त्यांना आपापसात जोडणारे जोडरस्ते चांगले असावेत. न्हावा-शेवा पोर्ट परिसरातील सीएफएस व एमटी कंटेनर यार्ड यांच्याकडे स्वत:ची पार्किंग नसल्याने होणारी कारवाई वाहतूकदारांवर न करता संबंधितांवर करावी. संबंधित यार्डला पार्किंग उपलब्ध करून देण्याची ताकीद देण्यात यावी. जेएनपीटी प्रशासनाने त्यांच्या परिसरामध्ये वाहनांस विनाशुल्क पार्किंगसाठी प्लॉट उपलब्ध करून वाहतूकतळ निर्माण करावेत.

मागण्यांसाठी एकवटले वाहतूकदार

ई-चलानमध्ये पारदर्शकता आणून त्यानंतरच कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या असल्याचे महाराष्ट्र मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी सांगितले.

या मागण्यांसाठी सर्व वाहतूकदार एकवटले असून संबंधित प्रशासनाला निवेदने देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व मागण्यांबाबत काही कारवाई न झाल्यास ३ आॅक्टोबरपासून आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
 

Web Title: Traffic congestion in Raigad, including Navi Mumbai, calls for agitation from Guru War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.