शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 3:12 AM

जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.

नवी मुंबई - जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. तसेच मालवाहू वाहनांना मुख्य मार्गावर प्रवेश बंदी, नो एंट्री, दंडात्मक कारवाई होत असल्याने वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नवी मुंबई व रायगडमधील वाहतूक संघटना एकत्र आल्या असून, अन्यायकारक प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी गुरु वार, ३ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरावरून मालाची वाहतूक करण्यासाठी राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातून जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. जेएनपीटी बंदराकडे जाणाºया रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी सारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत. वाहतूकदारांना उद्भवणाºया विविध अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सानपाडा येथील केमिस्ट भवन येथे नवी मुंबई आणि रायगडमधील वाहतूकदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तोपर्यंत वाहने रस्त्यावर न काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रमुख मागण्यांमध्ये प्रामुख्याने वाहतूककोंडी कमी करण्याकरिता रस्त्यांची दुरु स्ती तसेच सर्व्हिस रोडची कामे पूर्ण करून तो मार्ग स्थानिक व प्रवासी वाहने यांना उपलब्ध करून द्यावा. जेएनपीटीपासून १०० किलोमीटर अंतरापर्यंत सर्व रस्ते सुव्यवस्थित दर्जेदार असावेत. शिळफाटा-महापे, जेएनपीटी परिसरात लावण्यात आलेली प्रवेशबंदी काढून रस्ते पूर्ववत करण्यात यावेत. जेएनपीटी परिसरातील राज्य महामार्ग क्र ५४, राष्ट्रीय महामार्ग ४ बी, गव्हाण-दिघोडे या तिन्ही रस्त्यांना आपापसात जोडणारे जोडरस्ते चांगले असावेत. न्हावा-शेवा पोर्ट परिसरातील सीएफएस व एमटी कंटेनर यार्ड यांच्याकडे स्वत:ची पार्किंग नसल्याने होणारी कारवाई वाहतूकदारांवर न करता संबंधितांवर करावी. संबंधित यार्डला पार्किंग उपलब्ध करून देण्याची ताकीद देण्यात यावी. जेएनपीटी प्रशासनाने त्यांच्या परिसरामध्ये वाहनांस विनाशुल्क पार्किंगसाठी प्लॉट उपलब्ध करून वाहतूकतळ निर्माण करावेत.मागण्यांसाठी एकवटले वाहतूकदारई-चलानमध्ये पारदर्शकता आणून त्यानंतरच कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या असल्याचे महाराष्ट्र मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी सांगितले.या मागण्यांसाठी सर्व वाहतूकदार एकवटले असून संबंधित प्रशासनाला निवेदने देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व मागण्यांबाबत काही कारवाई न झाल्यास ३ आॅक्टोबरपासून आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई