कुर्ला-टिळक नगर दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 10:52 AM2017-12-11T10:52:19+5:302017-12-11T11:03:49+5:30
हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळते आहे.
मुंबई- हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कुर्ला ते टिळक नगर दरम्यान अप मार्गावर झालेल्या तांत्रिक बिघाडा मुळे हार्बर रेल्वे उशिराने सुरू आहे. सकाळी10 वाजून 10 मिनिटाने तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. सकाळी साडेदहा वाजता तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. दरम्या, सध्या वाहतूक उशिराने सुरू आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला. दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकलगाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या.
कर्जत ते बदलापूर-कल्याण आणि डोंबिवलीपासून ठाणे ते मुंबईपर्यंत आज दाट धुकं पसरलं होतं. त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावरील लोकलगाड्या पहाटेपासूनच उशिराने धावत होत्या.