- अनंत पाटीलनवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांना समस्यांचा विळखा पडला आहे. भुयारी मार्गांमध्ये पाणी साचत आहे. प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून स्टेशन परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा वावरही वाढला असून रेल्वे स्टेशननिहाय वस्तुस्थिती पुढीलप्रमाणेतुर्भे रेल्वे स्टेशनतुर्भे रेल्वे स्थानकात अनेक नागरी समस्या आहेत. स्टेशनच्या आवारात गळती सुरू आहे. रेल्वे फलाटावरील लोखंडी बाकडे तुटलेले आहेत. रेल्वे स्थानकात प्रवेश करताना काही चालू बंद दिव्यांमुळे अंधारातून जावे लागते. त्यातच भिंतींना गळती लागल्यामुळे सर्व पाणी खाली पडत आहे. छताचे पावसाचे पाणी जाणारे पाइप फुटल्यामुळे सर्व पाणी प्रवाशांच्या डोक्यावर पडत आहे. रेल्वे पादचारी पुलाची सोय नसल्यामुळे प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून जात असल्याने येथे अनेकदा लहान-मोठे अपघातही झालेले आहेत.कोपरखैरणे रेल्वे स्टेशनकोपरखैरणे या रेल्वे स्थानकात फलाट क्र . एक आणि दोनवर विजेच्या उघड्या डीपी बॉक्सची समस्या फार गंभीर आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांचा घोळका नेहमीच बसलेला असतो. मात्र पुरेशा पोलीस बळाअभावी अशा अपप्रवृत्तींना अटकाव केला जात नाही. येथील भिंतीतून पाणी येत असल्यामुळे गळती कायम आहे. भिकारी, फेरीवाले आणि भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. तिकीट खिडकीजवळ एक तिकीट वेंडिंग मशिन बंद आहे. त्यामुळे तिकिटासाठी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागतात. भरदिवसा भिकारी झोपा काढत असल्यामुळे हे स्टेशन या लोकांना आंदण दिल्याप्रमाणे आश्रमगृहासारखे राहतात. रेल्वेच्या आवारात ठिकठिकाणी बांधकाम साहित्य पडलेले आहे. पाणपोईची सुविधा आहे, पण तेथील नळच गायब असल्यामुळे प्रवाशांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.घणसोली रेल्वे स्टेशनघणसोली रेल्वे स्थानकाच्या पादचारी भुयारी मार्गाची अवस्था फार दळभद्री झाली आहे. या पुलात प्रवेश करताना ठाणे-बेलापूर महामार्गातील दिशेला पाण्याची गळती, केरकचºयाचे ढिगारे, दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. भिंतीतून पाणी गळती होत आहे. रात्री गर्दुल्ले आणि काही तृतीयपंथीय लोक असतात. डीपी बॉक्समधील विजेची बटणे आणि वायरिंग जळून काळी पडलेली आहेत. वाहने पार्किंगची समस्या गंभीर असून रिक्षाचालकांनी अतिक्र मण केले आहे.रबाळे रेल्वे स्टेशनरबाळे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. २ मध्ये पाणपोई असून पिण्याचे पाणीही उपलब्ध आहे, मात्र पाण्याचा निचरा व्यवस्थित साफसफाई केली जात नसल्याने दुर्गंधी पसरली असल्याने डेंग्यू, मलेरिया किंवा हिवताप यासारखे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. गळक्या भिंतीची समस्या कायम आहे. त्यामुळे प्रवाशांना पायºया चढणे आणि उतरण्यासाठी अक्षरश: जीव मुठीत धरून चालावे लागते. भिकाºयांची वर्दळ असून स्टेशनच्या आवारात ठाणे -बेलापूर महामार्गालगत झाडांच्या फांद्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत.ऐरोली रेल्वे स्टेशनऐरोली रेल्वे स्थानकात फारशी सुधारणा आहे. स्थानकाबाहेर माती आणि डेब्रिजचे ढिगारे आणि भिंतींची गळतीची समस्या वगळता जवळपास काहीच समस्या नाहीत. फलाट क्र . दोनवर स्टेशनचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांना चढताना आणि उतरताना त्रास सहन करावा लागतो.मुंबईच्या सेंट्रल रेल्वेप्रमाणे नवी मुंबईत बºयाचशा रेल्वे स्टेशन १0८ क्र मांकाची रु ग्णवाहिका सेवा उपलब्ध नाही. ती सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांच्या वैद्यकीय सोयी-सुविधांसाठी फार चांगली सोय होईल. तसेच कोपरखैरणे स्टेशन परिसरात उन्हा-पावसाच्या सुरक्षिततेसाठी शेड उभारले आहेत, त्याप्रमाणे इतर रेल्वे स्थानकात शेड लावल्यास रेल्वेने प्रवास करणाºया हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल यात तिळमात्र शंका नाही.- संजय सावंत,प्रभारी घणसोली रेल्वे स्टेशन
ट्रान्सहार्बरवरील स्थानके समस्याग्रस्त, प्रवाशांची गैरसोय :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 4:42 AM