शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:30 PM

विधानसभेच्या प्रचारात इच्छुकांची आघाडी : प्रभागातील मताधिक्यावर ठरणार उमेदवारी

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीनिमित्त महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये प्रभागामध्ये मताधिक्य देणाऱ्यांना पालिका निवडणुकीचे तिकीट दिले जाणार आहे. यामुळे इच्छुकांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल, २०२० मध्ये होणार आहे. फेब्रुवारी अखेरीस यासाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपासूनच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्थानिक पातळीवर नगरसेवक व इतर पदाधिकारी प्रचारामध्ये फारसे सहभागी झाले नसल्याचे पाहावयास मिळाले, परंतु विधानसभेची निवडणूक मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातामध्ये घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसह मनसेचेही प्रभागामधील कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. विधानसभेच्या उमेदवाराची पत्रके प्रत्यक्षात घरोघरी वाटली जात आहेत.

समाजमाध्यमांवरून छायाचित्रांसह उमेदवाराचा प्रचार केला जात आहे. हा प्रचार करताना उमेदवारासोबत स्वत:ची प्रतिमा व भूमिकाही नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. उमेदवार सोबत नसतानाही अनेक पदाधिकारी प्रत्येक घरी जाऊन प्रचार करत आहेत. रॅली व सभांमधील उपस्थितीही वाढली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन वगळून इतर सर्व नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते व गणेश नाईक समर्थक कार्यकर्ते यांनीही ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. भाजपमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची संख्याही वाढली असून, कार्यकर्त्यांमध्येच प्रचारासाठी चुरस सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेना व भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी प्रभागनिहाय मतदानाचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमधूनही शिवसेनेला मताधिक्य मिळाल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे धक्का बसलेल्या नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्यासाठीचा आग्रह माजी मंत्री गणेश नाईकांकडे धरला होता. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतरही प्रत्येक प्रभागनिहाय मतदानाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. जे मताधिक्य देतील, त्यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे नेत्यांनीही स्पष्ट केले आहे. कोण मताधिक्य देणार, यावर लक्ष देत आहोत. आत्ता दगाबाजी केली किंवा प्रचाराकडे दुर्लक्ष केल्यास महापालिका निवडणुकीमध्ये सहकार्य केले जाणार नाही, असेही काही नेत्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट केले आहे. यामुळे सुरुवातीच्या काळात प्रचाराकडे दुर्लक्ष करणारे कार्यकर्ते या आठवड्यात सक्रिय झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.प्रभागामधून मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीयांची धडपड सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

शिवसेनेतील नाराजीविधानसभेचे दोन्ही मतदार संघ भाजपसाठी सोडल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. एकही मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला नाही. यामुळे पदाधिकाºयांना पालिका निवडणुकीसाठी आपली ताकद अजमावून पाहण्याची संधीच मिळालेली नाही. दोन्ही आमदार भाजपचे झाल्यामुळे शिवसेनेलाही गळती लागण्याची भीती अनेकांना वाटू लागली असल्यामुळे एकतरी मतदार संघ मिळावा, यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.पदाधिकाºयांमध्ये तीव्र स्पर्धाभारतीय जनता पक्षामध्ये अगोदरचे पदाधिकारी व माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत आलेले नगरसेवक व पदाधिकारी यांच्यामध्ये प्रभागांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे. नवे व जुने दोन्ही पदाधिकारी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचार करत असल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे.दगाबाजी सहन होणार नाहीविधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाच्या उमेदवाराशी दगाबाजी केली जाण्याची शक्यता आहे. काही नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी प्रचारात मनापासून सहभागी होत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले होते. यामुळे दगाबाजी सहन केली जाणार नाही. प्रचाराकडे लक्ष न देणाºयांना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहकार्य केले जाणार नसल्याचे नेत्यांनी स्पष्ट केल्यामुळे सुरुवातीला प्रचारात सहभागी नसलेले अचानक उत्साहाने प्रचार करू लागले आहेत.