सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पोलीस आयुक्तांनी नुकतीच तीन सहायक आयुक्तांच्या जागांंमध्ये बदल केला आहे. त्यापैकी दोघांची चार महिन्यांवर निवृत्ती आहे. ऐन निवृत्तीच्या टप्प्यात बदल्या करण्यामागे अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी २० जानेवारीला तीन सहायक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यानुसार सहायक आयुक्त रवींद्र गिड्डे, नितीन भोसले पाटील व भागवत सोनावणे यांच्यात ही अदलाबदल करण्यात आली आहे. मात्र गिड्डे व भोसले पाटील यांची मे २०२१ मध्ये निवृत्ती आहे. त्यामुळे ऐन निवृत्तीपूर्वी अवघ्या चार महिन्यांवर गिड्डे यांना पनवेल विभागातून नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागात तर भोसले पाटील यांना पनवेल वाहतूक शाखेतून पनवेल विभाग व सोनावणे यांना अतिक्रमणमधून पनवेल वाहतूक शाखेचा पदभार देण्यात आला आहे.
या बदल्यांमागे बचावाचे कारण असल्याची चर्चा पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. एका सहायक आयुक्तांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रारी गेल्या आहेत. एका प्रकरणात झालेल्या निष्काळजीमुळे या तक्रारी केल्या त्यात इतरही काही अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला डाग लागू शकतो.
चौकशीचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी २० जानेवारीला तीन सहायक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. महासंचालक कार्यालयाकडून तत्कालीन आयुक्त, व इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश आले आहेत. यातून त्यांची चौकशी टाळण्यासाठी या बदल्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रवींद्र गिड्डे, नितीन भोसले पाटील व भागवत सोनावणे अशी त्यांची नावे आहेत.