मुंबई - हार्बर, ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. खांदेश्वर आणि मानसरोवरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे. दोन्ही दिशेने जाणा-या लोकल सेवेवर यामुळे परिणाम झाला आहे. बिघाडामुळे लोकल सेवा 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे. दरम्यान, बिघाड दुरुस्त करण्याचे युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या अधिका-यांना हार्बर रेल्वे मार्गावरील खोळंब्याची काहीही कल्पना नसल्याची माहिती समोर आली आहे. लोकल सुरळीत असल्याचे मध्य रेल्वे सांगितले. तर दुसरीकडे, रेल्वे पोलिसांनी हार्बर रेल्वे पोलिसांनी हार्बर रेल्वे मार्गावरील खांडेश्वर व मानसरोवर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याची माहिती दिली.