- वैभव गायकरपनवेल : सायन-पनवेल महामार्गावरून पनवेल शहरात प्रवेश करण्यापूर्वी खांदा वसाहतील सिग्नलवर वाहतूककोंडी नित्याचीच बनली आहे. दररोज एक ते दीड किमी वाहनांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावर ३ पूल व १ भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. त्यामुळे पनवेलमधील वाहतूककोंडी सुटण्याची शक्यता आहे.एमएसआरडीसी अंतर्गत हा महामार्ग येत असून, रुंदीकरण व नव्याने पूल बांधणीच्या कामाकरिता निविदा काढून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मार्गाच्या रुंदीकरणाने पनवेल शहराला लागलेल्या वाहतूककोंडीच्या ग्रहण सुटणार आहे. सुमारे ३९ कोटी निधी खर्चून या ठिकाणचा मार्गाच्या रुंदीकरणासोबत ३ पूल व १ भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, खांदा वसाहतीत प्रवेश करण्यासाठी नेहमीच चालकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते.मार्गालगत असलेल्या शिवमंदिर परिसरात एक पूल उभारण्यात येणार आहे, तसेच खांदा वसाहतीतील सिग्नलजवळ भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. या व्यतिरिक्त पंचमुखी हनुमान मंदिर, गाढी नदी, तसेच काळुंद्रे या ठिकाणी पूल होणार असल्याने काही मिनिटांत चालकांना पनवेलबाहेर पडता येणार आहे.सायन पनवेल महामार्ग पुढे कोकणाकडे जाणाºया मार्गाला जोडला आहे. सणाच्या, तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढते. या दरम्यान खांदा वसाहत, पंचमुखी हनुमान मंदिर, काळुंद्रे फाटा या ठिकाणाहून मार्गक्र मण करताना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते, तर अनेकदा लहान-मोठ्या अपघातांमुळे तासन्तास वाहतूककोंडी होते. मार्गाच्या रुंदीकरणाचे काम टीआयपीएल व पाटील प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत करण्यात येत आहे. ६ महिन्यांपूर्वी कामाला सुरु वात झाली असून, या वर्षातच मे महिन्यात हे सर्व काम पूर्ण होणार आहे.तीन पूल व भुयारी मार्गाची उभारणीमुंबई गोवा महामार्गावर रुंदीकरणासोबत खांदेश्वर या ठिकाणी एक पूल व खांदा वसाहत येथे सिग्नलजवळ भुयारी महामार्ग, पंचमुखी हनुमान मंदिर व काळुंद्रेजवळ पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कामाला सुरु वात झाली आहे. मे २०१८ पर्यंत सर्व काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पनवेलमधील वाहतूककोंडी सुटणार; सायन-पनवेल महामार्गावर तीन पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:11 AM