कचरा हस्तांतरणावरून सिडको-पालिकेत पुन्हा वाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 07:00 AM2018-02-02T07:00:34+5:302018-02-02T07:00:53+5:30
अनेक दिवसांपासून सिडको व पनवेल महापालिकेत कचराप्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधाºयांनी महापालिकेत कचराप्रश्न हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर केला. त्या दृष्टीने हालाचाली सुरू झाल्यानंतर सिडकोने १ फेब्रुवारी रोजी पालिका हद्दीतील सिडको वसाहतीमधील कचरा उचलण्यास बंद केल्याने अनेक ठिकाणी कच-याचे मोठे मोठे ढीग पाहावयास मिळाले.
पनवेल : अनेक दिवसांपासून सिडको व पनवेल महापालिकेत कचराप्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधाºयांनी महापालिकेत कचराप्रश्न हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर केला. त्या दृष्टीने हालाचाली सुरू झाल्यानंतर सिडकोने १ फेब्रुवारी रोजी पालिका हद्दीतील सिडको वसाहतीमधील कचरा उचलण्यास बंद केल्याने अनेक ठिकाणी कच-याचे मोठे मोठे ढीग पाहावयास मिळाले.
पनवेल महापालिका कचरा हस्तांतरणाला तयार नसल्याचे सद्यस्थितीवरून दिसून येत आहे. मात्र, या सर्व प्रकारात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. सिडकोने अचानकपणे कचरा उचलण्यास मनाई केल्याने पालिकेची पंचाईत झाली आहे. सिडको वसाहतीमधील या समस्येसंदर्भात नागरिकांनी नगरसेवकांच्या मागे तक्र ारीचा ससेमीरा लावला असल्याने नगरसेवकदेखील हैराण झाले आहे.
१ डिसेंबर रोजी कचरा पालिकेकडे हस्तांतरण होणार होते. मात्र, पालिका प्रशासनाने त्याला नकार दिला
होता. सध्याच्या स्थितीला स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना, हा प्रकार पालिकेच्या दृष्टीने योग्य नाही. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी, कचºयासंदर्भात पालिकेचे सर्वेक्षण सुरू आहे, पालिकेने हस्तांतरणाची तयारी दाखविली
नाही, सध्याच्या स्थितीला सिडकोच कचरा उचलेल, अशी प्रतिक्रि या दिली. यासंदर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.