सिडको वसाहतीत कचऱ्याचे ढीग

By Admin | Published: May 7, 2016 12:47 AM2016-05-07T00:47:57+5:302016-05-07T00:47:57+5:30

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिडको वसाहतीतील कचरा उचलला गेलेला नाही. त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरला असून प्रचंड दुर्गंधी येत आहे, तर नवीन पनवेलमध्ये कचऱ्याच्या गाड्याही

The trash cane in the CIDCO colony | सिडको वसाहतीत कचऱ्याचे ढीग

सिडको वसाहतीत कचऱ्याचे ढीग

googlenewsNext

पनवेल : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिडको वसाहतीतील कचरा उचलला गेलेला नाही. त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरला असून प्रचंड दुर्गंधी येत आहे, तर नवीन पनवेलमध्ये कचऱ्याच्या गाड्याही तुडुंब भरून उभ्या आहेत.
तळोजा येथील डम्पिंग ग्राऊंडवर सिडको वसाहतींमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. मात्र कचऱ्याची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे आरोग्य धोक्यात येत असल्याचे सांगून स्थानिकांकडून याठिकाणी कचरा टाकण्यास विरोध करण्यात येत आहे. याच कारणामुळे गुरुवारी तळोजा येथील डम्पिंग ग्राऊंडविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते.
सिडकोने नियुक्त केलेल्या बीवीजी कंपनीकडून दररोज २५० ते ३०० टन कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी सुटत असल्याने या डम्पिंग ग्राऊंडलाच विरोध होत आहे. बुधवारी दुपारी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डम्पिंग ग्राऊंडच्या गेटवर कचऱ्याच्या गाड्या अडवल्या आणि कचरा टाकण्यास विरोध केला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर व इतर वसाहतीत कचरा साचून आहे.
सिडकोने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पोलीस बंदोबस्तात कचरा डम्प करण्यात आला तरी सुध्दा आजच्या घडीला जवळपास एक हजार टन कचरा रस्त्यावर पडून आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून पादचाऱ्यांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. नवीन पनवेल येथील सिडको टर्मिनसमध्ये कचरा भरून गाड्या उभ्या आहेत. मात्र हा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)

कचऱ्याची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावली जाते, मात्र तरी सुध्दा गाड्या अडविण्यात आल्या. याबाबत तळोजा पोलीस ठाण्याला पत्र देण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात गुरुवारपासून कचरा टाकण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच वसाहतींमधील सगळा कचरा उचलला जाईल.
- गिरीश रघुवंशी,
कार्यकारी अभियंता, घनकचरा व्यवस्थापन, सिडको

Web Title: The trash cane in the CIDCO colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.