पनवेल : सिडकोने विकसित केलेल्या करंजाडे नोडमधील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या परिसरातील कचराही वेळेत उचलला जात नाही. काही ठिकाणी कचºयाला आग लावली जात असून, त्यामुळे परिसरामधील प्रदूषण वाढत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे, यामुळे सिडकोनेही पूर्ण लक्ष या प्रकल्पावर केंद्रित केले असून नोडमधील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या करंजाडे परिसरातील समस्याही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. येथील रोड, गटार, पाणी याबरोबर कचºयाची समस्याही गंभीर होत आहे. काही ठिकाणचा कचरा नियमित उचलला जात नाही, यामुळे अनेक वेळा कचºयाचे ढीग तयार होत असतात. दोन दिवसांपूर्वी सेक्टर ६ मध्ये कचºयाला आग लावण्यात आली. या कचºयात गॅरेजमधील आॅइलमिश्रीत कपडे व इतर साहित्यही टाकले होते. संपूर्ण परिसरामध्ये धूर पसरू लागला होता.
या परिसरामधील कचरा नियमित उचलण्यात यावा, कचºयाला आग लावली जावू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ं