नवी मुंबई : स्वमग्नता हा एक प्रमुख मज्जातंतूचा तसेच मनावर आघात करणारा बालरोग असून, भारतात २५० पैकी एका मुलाला हा रोग होतो. मुंबईतील न्यूरोजेन ब्रेन अॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूट उपचार केंद्राच्या वतीने शनिवारी सीवूड येथे ‘स्पीच प्ले’ नावाचे अॅप विकसित केले असून, लोकार्पण करण्यात आले. संवाद आणि उच्चारातील अडथळे दूर करणाऱ्या या अॅपच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आॅटिझमविषयी जनजागृती गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. अॅपच्या माध्यमातून उपचार पद्धतीने अधिक सुलभरीत्या करता येणे शक्य झाल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमात आॅटिझम झालेल्या मुलांच्या पालकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले, तसेच पालकांमध्ये जनजागृतीकरिता मार्गदर्शनपर पुस्तिकेचे प्रकाशनही या ठिकाणी करण्यात आले. आॅटिझम हा एक मज्जारज्जूसोबत निगडित असा विकार असून, यामध्ये भाषीय संवाद नसणे, खूप प्रमाणात उतावीळ होणे, हालचाली करणे, अतिशय राग येणे, सामाजिकरीत्या एकत्र न येणे आदी लक्षणे पाहायला मिळतात. भारतातील सुमारे एक कोटी मुले या विकारावर उपचार घेत आहेत. जनजागृतीअभावी आॅटिझम झालेल्या मुलांची बालकाला भाषा आणि तिचे उच्चारण विकसित होत असल्याचा असंतोष न्यूरोजेन ब्रेन अॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अलोक शर्मा यांनी व्यक्त केला. मात्र, ‘स्पीच प्ले’ या अॅपच्या माध्यमातून पालकांना चांगलाच फायदा होणार असून घरबसल्या वाणी वरील उपचार करता येणे शक्य झाले आहे, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदिनी गोकुळचंद्रन यांनी बोलीभाषा शिकविण्याकरिता या अॅपचा उपयोग होणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी ३००हून अधिक स्वमग्न विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
अॅपच्या माध्यमातून आता स्वमग्नतेवर उपचार
By admin | Published: April 09, 2017 2:55 AM