नवी मुंबई : पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने ५ जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई शहरात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
नवी मुंबई शहर हिरवे करण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत असून पालिकेच्या माध्यमातून नेरु ळ सेक्टर २६ येथील ज्वेल पार्क येथे ज्येष्ठ नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १००० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण दिनानिमित्त रबाळे येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालय येथे वृक्षलागवड कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मास पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., माजी महापौर सुधाकर सोनवणे, नगरसेविका रंजना सोनवणे, उप आयुक्त नितीन काळे उपस्थित होते. वृक्षलागवड प्रसंगी आयुक्तांनी नागरिक व विद्यार्थी यांना जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याचे आवाहन केले. या वर्षी मोरबे धरण परिसरात महापालिकेच्या माध्यमातून एक लाख व शहरात सुमारे २५ हजार अशी एकूण एक लाख २५ हजार वृक्षलागवड करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने भारतीय प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. नवी मुंबई शहरात गेल्या काही वर्षांपासून ग्रीन होप या संस्थेच्या माध्यमातून वृक्षरोपण मोहीम राबविली जाते. पर्यावरण दिनानिमित्ताने संस्थेच्या माध्यमातून घणसोलीतील सेक्टर ७ येथे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या वेळी आमदार संदीप नाईक, नगरसेवक घनश्याम मढवी, रमेश डोळे, नगरसेविका मोनिका पाटील पर्यावरणप्रेमी नागरिक, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेरु ळ सेक्टर १६ येथील छत्रपती संभाजी राजे उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले, या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष गणेश भगत, आनंदराव पवार, शिवाजी पिंगळे, चंद्रकांत महाजन, भीमराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. रबाळे येथील औद्योगिक क्षेत्रात आयएएचव्ही या संस्थेच्या माध्यमातून सीएसआर प्रकल्पांतर्गत तितवली हा वनिकरण कार्यक्र म राबविला जातो. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रबाळे येथे वृक्षारोपण करण्यात आले, या वेळी पर्यावरणाचे महत्त्व सांगून पर्यावरणाचा समतोल कसा राखावा, याबाबत माहिती देण्यात आली. या वेळी आयएएचव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश रामन, सतीश आठवले, नागेश वंकडारी, उमेश मुंडले आदी मान्यवर तसेच विविध स्वयंसेवी संस्था, एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशी आणि सानपाडा येथे नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आणि तुळसी रोपवाटपाचा कार्यक्र म संपन्न झाला. या कार्यक्र माला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा सुदर्शना कौशिक, शार्दूल कौशिक, चंद्रशेखर सिंग, संजीव शर्मा, रिटा सोमय्या, ज्ञानदीप सिंग, किशोर पाटील आदी मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई शहर हिरवे करण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत असून पालिकेच्या माध्यमातून नेरु ळ सेक्टर २६ येथील ज्वेल पार्क येथे नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1000 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.