पर्यावरणासाठी वृक्षलागवड लाभदायी
By admin | Published: July 2, 2017 06:20 AM2017-07-02T06:20:47+5:302017-07-02T06:20:47+5:30
राज्यात एकाच दिवशी चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. देशभरात महाराष्ट्राचा वृक्ष लागवडीत पहिला क्रमांक
जयंत धुळप/लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : राज्यात एकाच दिवशी चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. देशभरात महाराष्ट्राचा वृक्ष लागवडीत पहिला क्रमांक लागतो. वृक्षारोपणामुळे पर्यावरण समतोल राखला जाईल. वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे असून, भावी पिढीसाठी ते लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी शनिवारी येथे केले.
४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्याच्या वाडगाव येथे आयोजित जिल्ह्याच्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री महेता बोलत होते.
या वेळी आमदार पंडित पाटील, आमदार प्रवीण दरेकर, वाडगावचे सरपंच जयेंद्र घरत, जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपवनसंरक्षक मनीषकुमार, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक आप्पासाहेब निकत, परिक्षेत्र वनअधिकारी
आर. एस. पाटील, उपजिल्हाधिकारी रोहयो जयमाला मुरुडकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महेता म्हणाले, लावलेल्या झाडाचे संवर्धन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. उद्दिष्टापेक्षा जास्त झाडे लावल्याबद्दल त्यांनी रायगड जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाडगावचे माजी सरपंच ऋ षीकेश भगत यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रमास परिसरातील नागरिक, शेतकरी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
सावळे शाळेत कृषिदिन
मोहोपाडा : सावळे येथील ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या आवारात कृषिदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. या ‘वेळी झाडे लावा झाडे जगवा’चा संदेश देत, माजी सभापती गजानन माळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या आवारात विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पी. आय. गायकवाड, माजी सरपंच बी. एन. कांबळे आदींसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लागवडीबरोबर संवर्धनही महत्त्वाचे
आगरदांडा : मुरु ड तहसीलदार प्रांगणात व तेथील परिसरात मुरु डच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील व तहसीलदार -उमेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी मुरु ड तहसीलदार उमेश पाटील, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, नायब तहसीलदार नगरसेवक विजय पाटील आदी उपस्थित होते.
मुरु ड तहसीलदार -उमेश पाटील यांनी वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संवर्धन, संगोपनाची गरज असल्याचे स्पष्ट केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडांची लागवड करावी, असे आवाहन या वेळी केले.
चावडी वाचन उपक्रमाचा लाभ घ्यावा
१शासनाने सुरू केलेल्या चावडी वाचन उपक्र माचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन नेहुली येथे प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री महेता यांनी केले. या वेळी सात-बारा उताऱ्यांचे वाटपही करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
२महेता म्हणाले, राज्य शासनाने चावडी वाचनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. रायगड जिल्ह्याने सात-बारा वाटपाचे ८८ टक्के काम पूर्ण केले आहे. चावडी वाचन कार्यक्र म शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करून या कार्यक्र मातून ग्रामस्थांना सात-बारा, फेरफार या ंविषयी माहिती मिळणार आहे.
वृक्षलागवडीला सुरुवात
च्पाली : सुधागड तालुक्यात पालीतील तहसील कार्यालयाच्या आवारात महसूल, वन, पोलीस, पंचायत समिती, सामाजिक वनीकरण, तसेच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वृक्ष लागवड करण्यात आली. मोहिमेत सुधागड तालुक्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
पोलीस ठाण्यात वृक्षारोपण
वडखळ : पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या आवारात वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वडखळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक के. एल. पाटील, एन. एन. राऊळ, बी. एस. पाटील, एस. एस. अधिकारी, इ. पी. सकपाळ, व्ही. के. गोंजी, आदीसह वडखळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे असून नागरिकांनी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करून पर्यावरणाचे संतुलन राखावे, असे अवाहन पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेगरे यांनी या वेळी केले.