नवी मुंबई : ओएनजीसी येथील दुर्घटनेत शहिद झालेल्या सीआयएसएफ च्या जवाणांना वाशीत भावपुर्ण श्रध्दांजली वाहन्यात आली. याकरिता चौघाही शहिदांचे मृतदेह त्याठिकानी आणण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ अधिकारयांच्या उपस्थितीत त्यांना श्रध्दांजली वाहन्यात आली.
उरण येथील ओएनजीच्या प्लांटमध्ये स्फोट होवून आग लागल्याची घटना मंगळवारी घडली होती. यावेळी आग विजवण्याचे काम करत असताना सीआयएसएफ च्या अग्निशमन दलातील तिघा जवानांसह ओएनजीसीच्या एका अधिकारयाचा मृत्यु झाला. त्यांच्याकडून गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न सुरु असतानाच स्फोट झाल्याने ते होरपळले होते. ओएनजीसीचे अधिकारी सी. एन. राव, कॅप्टन ई. एन. नायका, एम. पासवान व सतिश कुशवाह अशी चौघा शहिदांची नावे आहेत. त्यांना वाशीतील सिआयएसएफ कॉलनी येथे भावपुर्ण श्रध्दांजली वाहन्यात आली. चौघांचेही मृतदेह त्याठिकाणी अंतीम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. याप्रसंगी सीआयएसएफ चे महानिरिक्षक सी. व्ही. आनंद, निलीमा राणी, राजनाथ सिंग, विष्णु स्वरुप, विनोदकुमार चौरासिया, शिप्रा श्रीवास्तव, रुची आनंद व महेश पौडवाल आदी अधिकारी उपस्थित होते. त्या सर्वांनी चौघाही शहिदांच्या कार्याचा गौरव करत पार्थिवावर पुष्पहार अर्पन केले. यादरम्यान संपुर्ण परिसरात शोकाकुळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, उरण मधील ओएनजीसी दुर्घटनेत वीर मरण प्राप्त झालेल्या प्रकल्प व्यवस्थापक एस एन राव यांच्यावर बुधवारी खारघर मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राव यांचे कुटुंबीय , सीआयएसएफचे जवान उपस्थित होते .