पनवेल : प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये ९ व्या बासरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. खारघर सर्च, खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट तसेच गुरुकुल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तब्बल ६८ बासरी वादकांनी एकाच वेळी आपली कला सादर करीत देशासाठी शहीद झालेल्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. शंभरपेक्षा जास्त कलाकार कार्यक्र मात सहभागी झाले होते. कार्यक्रमात पंडित विजय घाटे व पंडित चौरासिया यांची तबला व बासरीची चांगलीच जुगलबंदी रंगली. बासरी वादक विवेक सोनार यांनी देखील आपली कला यावेळी सादर केली. जन गण मन या राष्ट्रगीताने बासरीच्या तालावर कार्यक्र माला सुरु वात झाली. यावेळी साँग आॅफ लव्ह, सोलो आदींसह विविध प्रकारच्या बासरीच्या सुरांचा नजराणा रसिकांना अनुभवास आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे-वीज यांनी केले. आमदार प्रशांत ठाकूर, भजनसम्राट महादेवबुवा शहाबाजकर यावेळी उपस्थित होते.
बासरीवादकांची शहिदांना श्रद्धांजली
By admin | Published: January 28, 2017 3:03 AM