नवी मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती नवी मुंबई शहरात अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. १५ आॅक्टोबर हा त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा झाला. गुरुवारी विद्यार्थ्यांना विनादप्तर शाळेत येण्याची विशेष मुभा मिळाल्याने रोजच्या दप्तराच्या ओझे खांद्यावर नसल्याने बच्चेकंपनीमध्ये एक वेगळाच आनंद पहायला मिळाला. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दृष्टी, शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील, या दृष्टीकोनातून शहरातील सर्वच शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील सेंट लॉरेन्स हायस्कुलमध्ये मिसाईल मॅनची जयंती वाचन प्रेरणा दिवस साजरा करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी कोलाजच्या माध्यमातून कलामांचे चित्र रेखाटले. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आढावा घेणारे कथानक चित्रांच्या माध्यमातून मांडले. नेरुळमधील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलमध्येही ‘वाचन प्रेरणा दिन’ तसेच ‘दप्तरविना शाळा दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर आधारिक पुस्तके तसेच डॉ. कलाम यांनी लिहीलेल्या पुस्तकांचे वाचन केले. (प्रतिनिधी)नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २३९ प्राथमिक व १९१ माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधून वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी स्मृतींना उजाळा देत ग्रंथ वाचनाशी संबंधित विविध उपक्र म राबविण्यात आले. महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शाळांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार आठवडाभरापासून या दिनाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्याचे शाळांमार्फत नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आपआपसात पुस्तकांची देवाण घेवाण केली. विद्यार्थ्यांचे लाडके एपीजे अब्दुल कलाम यांंच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहण्यात आलेली ही श्रद्दांजली खरोखरच उत्तम उपक्रम आहे. -सायरा केनेडी, मुख्याध्यापिका, सेंट लॉरेन्स हायस्कूल
‘मिसाइल मॅन’ला श्रद्धांजली
By admin | Published: October 16, 2015 2:26 AM