होर्डिंग फाडून तणाव निर्माण करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 03:11 AM2018-06-04T03:11:44+5:302018-06-04T03:11:44+5:30
तुर्भे गावातील राजकीय होर्डिंग फाडून तणाव निर्माण करणाऱ्याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप मंगल पाटील (५८) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून सूडबुध्दीने होर्डिंग फाडल्याचे उघड झाले आहे.
नवी मुंबई : तुर्भे गावातील राजकीय होर्डिंग फाडून तणाव निर्माण करणाऱ्याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप मंगल पाटील (५८) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून सूडबुध्दीने होर्डिंग फाडल्याचे उघड झाले आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्हीमुळे संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
कोपरी येथे राहणारे रवींद्र हरड यांनी तुर्भे परिसरात शिवसेनेचे होर्डिंग लावले होते. मात्र रविवारी सकाळी काही होर्डिंग फाटल्याचे निदर्शनास आले.
अज्ञाताकडून राजकीय द्वेषातून ते फाडण्यात आले होते. यामुळे घडलेल्या प्रकाराची त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. यादरम्यान घटनास्थळालगतचे सीसीटीव्ही तपासले असता, रात्रीच्या वेळी एक व्यक्ती होर्डिंग फाडताना आढळून आली.
सदर व्यक्तीची पोलिसांनी
ओळख पटवली असता प्रदीप
पाटील (५८) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. ही व्यक्ती
तुर्भे गावातीलच राहणारी असून तक्रारदार हरड यांच्या परिचयाची व राजकीय विरोधक आहे. यामुळे राजकीय द्वेषातून त्याने हरड यांनी लावलेले शिवसेनेचे होर्डिंग फाडल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक
केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.