पारोळ : अंबाडी-शिरसाड मार्गावर भाताच्या तणाने भरलेल्या ट्रकला चांदीप येथे विजेच्या तारेचा स्पर्श होऊन आग लागली त्यात ट्रक जळाली. सुर्दैवाने चालकाने ती ट्रक मार्गाच्या खाली शेतात उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.चांदीप येथे चुन्नीलाल वर्मा यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये चांदीप येथे ७०० मोदल (भाताचे तण) भरले गेले. काही नागरीकांनी त्यांना सांगितले की गाडी जास्त उंच भरल्याने मार्गावर असलेली वीजेची तार लागेल पण चालकाने या बाबीकडे कानाडोळा केल्याने मार्गावर असलेली विजेची तार लागून गाडीने पेट घेतला. त्यावेळी घटनास्थळी मांडवी पोलीस दाखल होत. त्यांनी अग्नीाशमक दलाला पाचारण केले. अर्धातासाने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल होईल. त्यांनी गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात जास्त तण भरलेल्या गाड्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून जर असा प्रसंग गावाजवळ घडला तर मोठी जिवीत व वित्तहानी होऊ शकते. भाताच्या तणाने व अति उंच भरलेल्या गाड्यावर आम्ही कारवाई करून वाहतूक नियमाप्रमाणेच गाडीमध्ये भाताचे तण भरण्याचे आदेश देणार असल्याचे विरार पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुनिल माने यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)
विजेची तार लागल्याने ट्रक पेटला
By admin | Published: November 30, 2015 2:14 AM