शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

वितरकाला लुटण्याचा प्रयत्न

By admin | Published: February 15, 2017 4:54 AM

मोबाइल सिमकार्ड कंपनीच्या वितरकाला लुटण्यासाठी आलेल्या टोळीच्या दोघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. पिस्तूलचा

नवी मुंबई : मोबाइल सिमकार्ड कंपनीच्या वितरकाला लुटण्यासाठी आलेल्या टोळीच्या दोघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. पिस्तूलचा धाक दाखवून ते लुटण्याचा प्रयत्न करत असतानाच वितरकाने केलेल्या प्रतिकारामुळे व नागरिकांच्या धाडसामुळे दोघांना अटक झाली आहे. त्यापैकी एकावर यापूर्वी कुर्ला येथे गुन्हा दाखल आहे.राजू माळी या मोबाइल सिमकार्ड वितरकासोबत सोमवारी रात्री हा प्रकार घडला. नेरूळ सेक्टर ८ येथे राजीव गांधी पुलालगत त्यांचे कार्यालय असून दररोज ते शहरातून सिमकार्ड विक्रीची जमा झालेली रक्कम घेवून जायचे. सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे ५५ हजार रुपयांची रक्कम घेवून गाडीमध्ये बसत असताना अज्ञात तिघे जण त्यांच्या कारमध्ये घुसले. त्यापैकी एकाने माळी यांना पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रकमेची पिशवी खेचून पळ काढला. मात्र माळी यांनी त्यापैकी एकाला धरून ठेवत आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. याचवेळी त्याठिकाणावरून जाणाऱ्या नेरूळ पोलिसांच्या बिट मार्शल कर्मचाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी नागरिकांच्या मदतीने इतर एकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोघांच्या झडतीमध्ये त्यांच्याकडून गावठी कट्टा व माळी यांची लुटलेली रक्कम आढळून आली. प्रेसित नार्वेकर व सागर कुरणे अशी त्यांची नावे असून नार्वेकर हा कुलाबा येथील तर कुरणे हा ठाण्याचा राहणारा आहे. त्यांच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नार्वेकर याच्यावर यापूर्वीचा कुर्ला पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले. तर कुरणे हा ओला कारचा चालक असून दरोड्यानंतर माळी यांची कार चालवण्यासाठी त्याचा वापर केला जाणार होता. माळी यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्याकडून दरोड्याचा हा प्रयत्न झाल्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)