शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

महापौर बंगल्याविषयी माहिती लपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2015 1:57 AM

पारसिक हिलवरील महापौर बंगल्याच्या देखभालीसाठी किती खर्च होत आहे, त्याचा वापर कोण करते, असा लेखी प्रश्न शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी सर्वसाधारण

नवी मुंबई : पारसिक हिलवरील महापौर बंगल्याच्या देखभालीसाठी किती खर्च होत आहे, त्याचा वापर कोण करते, असा लेखी प्रश्न शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी सर्वसाधारण सभेत विचारला होता. परंतु प्रशासनाने उत्तर देण्याचे टाळल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माहिती न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९६ मध्ये पारसिक हिलवर महापौर बंगला बांधण्यात आला. २००५ नंतर या ठिकाणी महापौर पूर्णवेळ वास्तव्यास गेले नाहीत. यामुळे सदर बंगल्याचा वापर कोण करते, त्याच्या देखभालीवर किती खर्च होतो, याविषयी नेहमीच चर्चा होत असते. याविषयी वास्तव माहिती समोर यावी, यासाठी माजी सिडको संचालक व नगरसेवक नामदेव भगत यांनी महासभेमध्ये लेखी प्रश्न विचारला होता. या बंगल्याचा वापर महापौरांसाठीच होत आहे का, महापौर निवासामध्ये किती कर्मचारी आहेत, देखभालीसाठी किती खर्च होतो, सदर ठिकाणी सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत का, अशी विचारणा केली होती. परंतु या प्रश्नांची उत्तर आयुक्तांनी दिलीच नाहीत. यामुळे भगत यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. महापौर पारसिक हिलच्या बंगल्यावर राहतच नाहीत. त्या वास्तूचा वापर दुसरेच कोणीतरी करीत असल्याची शक्यता व्यक्त केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी मी त्या ठिकाणी जातो असे सांगितले, परंतु तुमच्या वाहनाच्या नोंदीमध्ये कधीच महापोर बंगल्यावर गेल्याचा उल्लेख नसल्याचे भगत यांनी सांगितले. यानंतर महापौरही निरुत्तर झाले. प्रशासनाने महापौर बंगल्याविषयी माहिती दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिला. अर्धा तास याविषयी चर्चा सुरू होती. विरोधक आक्रमक होऊ लागल्यामुळे अखेर महापौरांनी सभा गुंडाळली. सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना भगत यांनी प्रशासनावर टीका केली. महापौर बंगल्यावर सुरक्षेसाठी कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. त्याच्या देखभालीसाठी किती खर्च होतो व त्याचा वापर कोण करते, याची माहिती नागरिकांना मिळालीच पाहिजे. प्रशासनाने जर याविषयी माहिती दिली नाही तर शासनाकडेही तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.