सानपाड्यात तुलसी रामायण ज्ञानयज्ञ सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:13 AM2019-01-29T00:13:28+5:302019-01-29T00:13:40+5:30
श्रीराम सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या सहयोगाने अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान व अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या संयुक्त पुढाकाराने सानपाडा येथे तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई: श्रीराम सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या सहयोगाने अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान व अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या संयुक्त पुढाकाराने सानपाडा येथे तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सात दिवस चाललेल्या सोहळ्याअंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. ह.भ.प.रामरावजी महाराज ढोके यांनी सादर केलेल्या समधुर तुलसी रामायण कथेने उपस्थित श्रोतेगण भक्तीरसात न्हाऊन गेले होते.
सोहळ्याअंतर्गत नवी मुंबईतील वारकरी सांप्रदायातील अनेक दिग्गज कीर्तनकार व प्रवचनकारांसह विविध राजकीय पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवक तसेच मान्यवरांनी उपस्थिती लावली. सात दिवसाच्या सोहळ्यांत पाच ते सहा हजार भाविकांनी हजेरी लावली. कीर्तनकार, प्रवचनकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
नवी मुंबईत वारकरी भवन निर्माण व्हावे, ही जुनी मागणी आहे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी इच्छा श्रीराम सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शंकर पिंगळे यांनी यावेळी व्यक्त केली. प्रतिष्ठानचे खजिनदार प्रकाश शेटे यांनी संपूर्ण सोहळ्याचे शानदार सूत्रसंचालन केले.