टुरटूर झाली सुरु
By admin | Published: November 14, 2015 02:14 AM2015-11-14T02:14:04+5:302015-11-14T02:14:04+5:30
दिवाळीला जोडून सुट्टी घेऊन गोवा, केरळ, हैद्राबाद, राजस्थान किंवा महाराष्ट्रातील कोकण, महाबळेश्वर किंवा माथेरानला जाण्याकडे ठाणे, डोंबिवली अथवा कल्याणमधील रहिवाशांचा
जान्हवी मोर्ये , ठाणे
दिवाळीला जोडून सुट्टी घेऊन गोवा, केरळ, हैद्राबाद, राजस्थान किंवा महाराष्ट्रातील कोकण, महाबळेश्वर किंवा माथेरानला जाण्याकडे ठाणे, डोंबिवली अथवा कल्याणमधील रहिवाशांचा कल असल्याचे टुर्स अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रातील जाणकारांकडून समजले. चिकू सफारी, बोट सफारी, पोपटी पार्टी, आजी-आजोबा सहल अशा तब्बल ३५ प्रकारच्या टुर्सना तुडुंब प्रतिसाद लाभला आहे.
दिवाळीच्या चार दिवसांना जोडून चार-आठ दिवसांची सुट्टी टाकून जवळच पर्यटनाकरिता जाण्याचे बेत ठाणे परिसरातील मंडळींकडून पक्के केले जात असल्याने सध्या वेगवेगळ््या ठिकाणचे बुकींग फूल आहे. रेल्वे अथवा विमान तिकीटेही सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.
सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची हलकी चाहूल लागली आहे. त्यामुळे राजस्थान, दिल्ली येथे पर्यटनाकरिता काहींची पावले वळत आहेत. गोवा, केरळ असो की कोकण तेथील निसर्ग सौंदर्य नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. त्यामुळे काहींनी तेथे जाण्याकरिता तयारी केली आहे. ज्यांना फारशी सुट्टी मिळणे शक्य नाही त्यांनी महाबळेश्वर किंवा माथेरान हा अगदी जवळचा पर्याय निवडला आहे.
त्रिगुण टॅ्रव्हल्सचे प्रवीण दाखवे यांनी सांगितले की, सध्या हिमालयात बर्फवृष्टी सुरु झाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी मोजकेच पर्यटक जाणे पसंत करीत आहेत. केरळ, हैद्राबाद, राजस्थान याठिकाणी पर्यटनासाठी ठाणेकर अधिक जात आहेत. हे राज्याबाहेरील पर्यटन असले तरी तो कल हा निसर्गाशी नाते सांगणारा आहे. महाराष्ट्रातील कोकणात, महाबळेश्वर आणि माथेरानचे बुकिंगही फुल्ल आहे. याशिवाय अंजिठा वेरूळला जाणे पर्यटक पसंत करीत आहेत. सिल्वासा आणि सापुतारा येथीलही चौकशी केली जात आहे.