- मधुकर ठाकूरउरण : यंदा हिवाळी हंगामाला उशीरा सुरुवात झाली. या काळातच जलाशये, खाडी परिसर, समुद्रकिनाºयावर विविध स्थलांतरीत पक्षांची गर्दी वाढते. त्यामध्ये अग्निपंखी आणि जलचर पक्षांची संख्या अधिक असते. भातशेतीचाही हंगाम संपुष्टात आला आल्याने उरण परिसरातील झाडेझुडपे, बागबगीचे, शेती, बांबुचे वन आणि समद्र किनाºयावरील वाळूवर विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणात नजरेत पडू लागले आहेत. आकर्षक पाहुण्याच्या अभ्यासासाठी पक्षीनिरिक्षकांचीही गर्दी वाढली आहे.पक्षांच्या काही प्रजाती या थव्याथव्याने विहार करताना दिसतात. काही जातीच्या पक्षांचा रंग सभोवतालच्या परिस्थितीशी जुळणारा असतो. त्यामुळे असे पक्षी चटकन नजरेला दिसत नाहीत. मोकळ्या किंवा दाट झाडाझुडपांतही विविध रंगी बहुढंगी पक्ष्यांचे थवेही नजरेत पडतात. काही जातीचे पक्षी उजाड शेती आणि माळरानातच आढळतात. तर काही छोटे-मोठे पक्षी विशिष्ट आवाजाने वाटसरूंचे लक्ष वेधून घेतात.लाल मुनिया, विविधरंगी चिमणी, सुगरण, गुलाबी पिंच, कालशीर्ष, भारीट, पर्वत कलर, चिरक, दयाळ, छोटा सातभाई, नर्तक, कोतवाल, सुतार, बैरागी, शेंदरी जेरडीनचा क्लोरॉप्सिस, पोपट,करडा धोबी, नटहॅच, राखी वटवट्या, शिंपी, कस्तुर, टकाचोर, राखी खाटीक, छोटा हिरवा राघू, तांबडा होला, हरतालिका, निलकंठ, खंड्या, भारव्दाज, सीगल्स आदी आकर्षक पक्षांचा समावेश आहे.शेतवाडी, माळरानाबरोबरच चराऊ रानेही पक्ष्यांची आवडती ठिकाणे आहेत. विपुल प्रमाणात मिळणारे भक्ष्य आणि निसर्गाच्या सानिध्यात मोठ्या प्रमाणात पक्षी वास्तव्य करुन असतात. अगदी छोट्या आकारातील लव्हबडर््स, ब्ल्यू जेल, कोरासियस गेरुलस यासारखे पक्षी उत्तर भारतातून अनकूल ठिकाणी तसेच आफ्रिकेपर्यंत स्थलांतरित होतात.धनेश सारखे पक्षी आसाम भागातून येतात. तर काही पक्षी वड, पिंपळ, उंबर आदी घनदाट वृक्षांवर घरटी करतात.काळ उडता येत नसल्याने पद्मपुष्प किंवा कस्तूर पक्षी उथळ जागी उड्या मारीत पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात दिसून येत आहेत. अधूनमधून दुर्मिळ गरुड जंगल परिसरातून झेपावताना दिसतात.या आकर्षक अनाहून पक्षांनी सध्या उरण परिसरातील पर्यटकांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.विशिष्ट आवाज करणारे सुगरण पक्षी नजरे पडत असल्याने पक्षीप्रेमीही सुखावले आहेत.भात-पीकांचा हंगाम नंतर विणीचा हंगाम सुरु झाला आहे. विणीच्या हंगामातच माळरानात किंवा शेतांच्या, रस्त्यांच्या कडेला असलेल्या बांबु, ताड, माड, बाभूळ आदी झाडांच्या फाद्यांवर सुगरण पक्षी घरटी बांधण्यास सुरुवात करतात.सुगरण पक्षी कलाकुसरीने आपला खोपा बांधण्यासाठी प्रसिध्द आहेत. गवत, तृण धान्यांची लांब पाती एकत्र विणून बकपात्राच्या आकाराचे घरटे झाडांच्या फांदीवर नर सुगरण बांधतो.सुगरण पक्षातील नर ओळीने एकाच वेळी अनेक घरटे बांधतो. अर्धवट बांधलेल्या घरटयांतून सुरेल स्वर काढून तो मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो.मादीच्या पसंतीनंतरच खोपा पूर्ण बांधून होत असल्याचे पक्षीनिरिक्षक सांगतात. सध्या उरणमधील रस्त्यालगतच्या झाडांवर अशा प्रकारे अनेक खोपे दिसू लागले आहेत.सुगरणीच्या खोप्यांचे पर्यटकांना आकर्षणथंडीच्या आगमनाबरोबरच उरण परिसरात सुगरण पक्ष्यांचे थवे दिसून लागले आहेत. विणीचा हंगामानंतर रस्त्यालगतच्या विविध झाडांवर सुगरणीचे खोपे लोंबकळताना दिसू लागली आहेत.
उरणमध्ये किलबिलाट; पाहुण्या पक्ष्यांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 1:49 AM