उर्से : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से हद्दीत झालेल्या विविध अपघातात एक जण जागीच ठार, तर दहा जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडली.द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास किलोमीटर क्रमांक ८४/१०० जवळ टेम्पो (क्रमांक व्हीएस ०७ यूबी ३५४०) मुंबईकडून पुण्याकडे जात असताना पुढे जाणाऱ्या टेम्पोला (क्रमांक एमएच ०४ एफयू ४०७५) मागून भरधाव वेगाने धडकला. टेम्पो पुणे-मुंबई लेनवर जाऊन येथून मुंबईकडे जाणारी लक्झरी बसला (केए २५ डी ४८७७) धडक दिल्याने लक्झरी बस दुभाजकाच्या मध्यभागी येऊन पलटी झाली. यामध्ये बसमधील सुवर्णा बिसंगप्पा जनापुरे (वय ३५, रा. भालकी, बिदर, कर्नाटक) हिचा जागीच मृत्यू झाला. बसमधील दहा जण किरकोळ जखमी झाल्याने त्यांना निगडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, अशी माहिती तळेगाव पोलीस स्टेशनचे हवालदार एम. बी. शेंडगे यांनी दिली.द्रुतगती महामार्गावर शिवनेरी व्हॉल्व्हो व ट्रकमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच मृत्युमुखी पडला. ओझर्डे हद्दीत गुरुवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. किलोमीटर क्रमांक ७८/५० येथे मुंबईकडून पुण्याकडे जाणारी शिवनेरी व्हॉल्व्हो (एमएच १२ एफझेड ८५४१) बसने पुढे जाणाऱ्या ट्रकला (बीजे ०७ डीयू ८३३) जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात व्हॉल्व्होचा चालक सुधाकर शिवाजी देवघरे (वय ४०, रा. हिंगोली, ता. जावळी, जि. सातारा) हे जागीच ठार झाले.(वार्ताहर)
दोन अपघात; एक ठार, १० जखमी
By admin | Published: June 19, 2015 10:35 PM