नवी मुंबई : महापालिका व सिडकोने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या घरांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनधिकृत घरे अधिकृत असल्याचे भासवून त्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनीही गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. नेरूळ सेक्टर ११ मधील रमण नागनाथ आदोने व इतर नागरिकांनी नेरूळ सेक्टर २० मधील घर क्रमांक ७७१ / १ वर बहुमजली इमारतीमध्ये घर विकत घेतले होते. मार्च २०१३ ते मार्च २०१७ दरम्यान फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ५० लाख ९१ हजार रुपये बिल्डरला दिले होते. शोभा आनंद होडे व शोभा परमेश्वर गौडा या दोघांनी या घरांची विक्री करताना बांधकाम अधिकृत असल्याचे भासविले होते. पण प्रत्यक्षात हे बांधकाम अनधिकृत असून त्यावर पालिका व सिडकोने कारवाई केली आहे. यामुळे घर घेण्यासाठी पैसे दिलेल्या नागरिकांची फसवणूक झाली असून या प्रकरणी होडा व गौडा या दोघांविरोधात नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अनधिकृत घरे विकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
By admin | Published: March 24, 2017 1:20 AM