शस्त्रे विकणाऱ्या दोघांना अटक

By admin | Published: May 19, 2017 03:54 AM2017-05-19T03:54:54+5:302017-05-19T03:54:54+5:30

अवैध अग्निशस्त्रे विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना एका देशी बनावटीचे पिस्तूल, तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल यांनी पकडले.

The two arrested for arms were arrested | शस्त्रे विकणाऱ्या दोघांना अटक

शस्त्रे विकणाऱ्या दोघांना अटक

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : अवैध अग्निशस्त्रे विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना एका देशी बनावटीचे पिस्तूल, तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल यांनी पकडले.
शहराजवळील तक्का गाव, के मॉलजवळ अग्निशस्त्रे विक्री करण्याकरिता काही जण येणार असल्याची बातमी गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे पोलीस शिपाई सम्राट डाकी यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर, सपोनि बबन जगताप, सुभाष पुजारी, किरण भोसले, पो.ह. अनिल पाटील, सुनील साळुंखे, विजय अहिरे, महेश चव्हाण, आदींच्या पथकाने सापळा रचून आरोपी फहीम वकील मलिक (२४, रा. गोवंडी) याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगमधून एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे असा एकूण ८६,१०० रु पयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. दुसरा आरोपी शहनावाज महम्मद अस्लम शेख (३०) याला सुद्धा पनवेल बस स्टॉप परिसरात अटक केली आहे.

Web Title: The two arrested for arms were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.