वाहन चोरणा-या दोघांना अटक, पनवेलच्या गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 03:54 AM2017-08-23T03:54:06+5:302017-08-23T03:54:33+5:30
शहरासह खारघर, नेरुळ आदी परिसरांतून एक हुंडाई कार तसेच १० दुचाकी चोरणाºया सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलनने शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील गाड्या हस्तगत केल्या आहेत.
पनवेल : शहरासह खारघर, नेरुळ आदी परिसरांतून एक हुंडाई कार तसेच १० दुचाकी चोरणाºया सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलनने शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील गाड्या हस्तगत केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पनवेलमध्ये दुचाकीचोरीचे प्रमाण वाढले होते. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह. पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोशी, सपोआ. नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-२ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांनी यासंदर्भात शोधमोहीम सुरू केली. खांदा वसाहत परिसरात आरोपी गाड्या चोरण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता, सपोनि सुभाष पुजारी, किरण भोसले, बबन जगताप, पो. ह. अनिल पाटील, पद्मसिंग पवार, संजीव पगारे, महेश चव्हाण, राकेश मोरे, प्रमोद पाटील, पो. ना. विनोद पाटील, सुनील कानगुडे, परेश म्हात्रे, सूर्यकांत कुडावकर, प्रफुल्ल मोरे, पो. शि. सम्राट डाकी, पो. ह. राजेश बैकर आदींच्या पथकाने गाडी चोरण्यासाठी आलेले मलकीतसिंग महेंदरसिंग ऊर्फलख्या (२४, मोठा खांदा गाव) व गुरमितसिंग सुरेंदरसिंग ऊर्फ लवली (२२, मोठा खांदा गाव) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी एक हुंडाई कार, तसेच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.