नवी मुंबई : एका हॉटेलचालकाकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह एका तंत्रज्ञाला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. सचिन फुलझेले आणि दीपक मराठे असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही महावितरणच्या वाशी कार्यालयात कामाला आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदनिकेच्या तळमजल्यावर सुरू केलेल्या हॉटेलसाठी व्यावसायिक विद्युत मीटर बसविण्यासाठी तक्रारदाराने महावितरणच्या संबंधित विभागाकडे अर्ज केला होता. त्यासाठी प्रधान तंत्रज्ञान दीपक मराठे आणि सहायक अभियंता सचिन फुलझेले यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.त्यामुळे तक्रारदाराने याप्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून १० मे रोजी सांयकाळी ६:४५ वाजता लाचेचे पाच हजार रुपये स्वीकारताना या मराठे आणि फुलझेले या दोघांना रंगेहाथ अटक केली.
महावितरणचे दोन लाचखोर अधिकारी जाळ्यात
By कमलाकर कांबळे | Published: May 11, 2024 7:39 PM