दोन कोटींची लूट : पुराव्याअभावी दरोडेखोरांचा माग सापडेना, पाच महिन्यांपासून खोदत होते भुयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 03:19 AM2017-11-15T03:19:21+5:302017-11-15T03:19:40+5:30

जुईनगर येथील बँक आॅफ बडोदावर टाकलेल्या दरोड्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. गुन्हेगारांनी पाच महिने बँकेशेजारच्या दुकानात वास्तव्य करूनही कोणताही पुरावा मागे ठेवलेला नाही.

 Two crore robbery: Finding the track of robbers without proof, digging for five months. | दोन कोटींची लूट : पुराव्याअभावी दरोडेखोरांचा माग सापडेना, पाच महिन्यांपासून खोदत होते भुयार!

दोन कोटींची लूट : पुराव्याअभावी दरोडेखोरांचा माग सापडेना, पाच महिन्यांपासून खोदत होते भुयार!

Next

सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : जुईनगर येथील बँक आॅफ बडोदावर टाकलेल्या दरोड्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. गुन्हेगारांनी पाच महिने बँकेशेजारच्या दुकानात वास्तव्य करूनही कोणताही पुरावा मागे ठेवलेला नाही. दरोडा टाकल्यानंतर रविवारी पहाटेच त्यांनी पळ काढल्याचे पोलीस तपासात समोर आले
आहे.
बँकेतील २२५पैकी ३० लॉकर त्यांनी फोडले. त्यात २० ग्राहकांचा सुमारे दोन कोटींचा ऐवज लुटून नेण्यात आला आहे. उर्वरित दहा ग्राहकांच्या लॉकरची माहिती पोलीस मिळवित आहेत. सुमारे तीन फूट व्यासाचे व ३० फूट लांब भुयार खोदून तीन ते चार जणांनी ही बँक लुटल्याची शक्यता आहे. सर्व दरोडेखोर सराईत गुन्हेगार असल्याचे त्यांनी घेतलेल्या खबरदारीवरून स्पष्ट होत
आहे.
दुकानाचे महिन्याला २५ हजार भाडे!
पाच महिन्यांपूर्वी त्यांनी बँकेजवळचा तिसरा गाळा भाड्याने घेतला होता. गेना प्रसाद व्यक्तीच्या नावे भाडेकरार झाला, मात्र ती व्यक्ती परत तिकडे फिरकलीही नाही. दुकानात केवळ दोन कामगार तरुणच दिसायचे. अनेकदा त्यांचे दुकान बंद असायचे व दुकानात पुरेसे साहित्य नव्हते. दुकानाच्या भाड्याचे २५ हजार रुपये मात्र गाळामालक शरद कोठावळे यांना वेळेवर मिळायचे.
...तर दरोडा टळला असता-
श्री बालाजी जनरल स्टोअर्स नावाचे हे दुकान अनेकदा बंद असायचे. ग्राहकांना दुकानातील साहित्यावर धूळ दिसायची. कामगारांना वस्तूंची किंमतही माहिती नसायची. त्यावरून कोणाला संशय आला असता तर दरोड्याचा कट फसला असता.
कुदळ, हत्यारे सापडली : भुयार खोदण्यासाठी दरोडेखोरांनी कुदळ व इतर हत्यारांचा वापर केला. ती हत्यारे दुकानात सापडली आहेत. भुयाराचे शेवटचे खोदकाम त्यांनी शुक्रवारी रात्री बँक बंद झाल्यानंतर केले असावे. त्यानंतर पुढील दोन दिवस लॉकर फोडण्याचे काम केले. गोणी भरून ऐवज नेताण्याच्या हालचाली सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्याचे सूत्रांकडून समजते.
ग्राहकांवर दु:खाचा डोंगर-
जुईनगर येथील रहिवासी शीला घाडगे यांच्या पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांचे तेराव्याचे कार्य उरकत असतानाच बँकेवरील दरोड्यात लॉकरमधील ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली.
यामध्ये त्यांनी नुकताच साखरपुडा झालेल्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेले दागिने ठेवले होते. त्यामुळे हे दागिने चोरीला गेल्याने अगोदरच दु:खात असलेल्या घाडगे कुटुंबावर संकट कोसळले आहे.

Web Title:  Two crore robbery: Finding the track of robbers without proof, digging for five months.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.