कोकण रेल्वेच्या मार्गांवर दाेन दिवस मेगाब्लॉक; सात गाड्यांच्या वेळापत्रकांमध्ये बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:27 AM2023-11-13T10:27:39+5:302023-11-13T10:27:49+5:30

मडगाव-कुमठा विभागात दुरुस्तीचे काम हाेणार असल्याने दोन गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे.

Two Days Megablock on Konkan Railway Lines; Change in schedules of seven trains | कोकण रेल्वेच्या मार्गांवर दाेन दिवस मेगाब्लॉक; सात गाड्यांच्या वेळापत्रकांमध्ये बदल

कोकण रेल्वेच्या मार्गांवर दाेन दिवस मेगाब्लॉक; सात गाड्यांच्या वेळापत्रकांमध्ये बदल

नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या दोन मार्गांवरील मडगाव - कुमठा आणि राजापूर रोड ते सिंधुदुर्ग या विभागात १६ आणि १७ नोव्हेंबर असे दोन दिवस अनुक्रमे तीन आणि अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल केला आहे. 
मडगाव-कुमठा विभागात दुरुस्तीचे काम हाेणार असल्याने दोन गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे.

मंगळुरू सेंट्रल-मडगाव जंक्शन या गाडीचा प्रवास १६ नोव्हेंबर रोजी  कुमठा स्थानकावर थांबेल आणि कुमठा ते मडगाव विभागादरम्यान अंशत: रद्द होईल. मडगाव जंक्शन-मंगळुरू सेंट्रल या गाडीचा १६ नोव्हेंबर रोजीचा प्रवास कुमठा स्थानकातून नियोजित वेळेत सुरू होईल. परंतु, मडगाव-कुमठा विभागादरम्यान अंशतः रद्द होईल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे. 

तीन गाड्यांच्या वेळेचे नियमन

राजापूर रोड-सिंधुदुर्ग विभागादरम्यान  मडगाव जंक्शन-सावंतवाडी रोड आणि सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस या दोन गाड्यांचे वेळापत्रक पुनरर्चित केले आहे. या गाड्या अनुक्रमे  ८० मिनिटे,  २ तास ५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. मुंबई सीएसएमटी (१२०५१)  या जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास  रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २०  मिनिटांसाठी नियमित केला जाईल. मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन (२२११९) या तेजस एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २० मिनिटांसाठी रोखून धरला जाईल. 

Web Title: Two Days Megablock on Konkan Railway Lines; Change in schedules of seven trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.