कोकण रेल्वे मार्गावर आज दोन तासांचा मेगाब्लॉक

By कमलाकर कांबळे | Published: December 3, 2023 09:17 PM2023-12-03T21:17:50+5:302023-12-03T21:17:58+5:30

नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील मदुरे ते माजोर्डा विभागात ४ डिसेंबरला देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी दोन तासांचा मेगाब्लॉक जाहीर ...

Two hour megablock today on Konkan railway line | कोकण रेल्वे मार्गावर आज दोन तासांचा मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर आज दोन तासांचा मेगाब्लॉक

नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील मदुरे ते माजोर्डा विभागात ४ डिसेंबरला देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी दोन तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या तीन गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे.

मेगाब्लॉकमुळे लोकमान्य टिळक टर्मिनल (१६३४५) या गाडीचा सुरू होणारा तिरूवनंतपुरममध्ये नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी ते सावंतवाडी रोड विभागादरम्यान अडीच तासांसाठी रोखून धरला जाणार आहे. त्याचप्रमाणे लोकमान्य टिकळ टर्मिनल - मंगळुरू सेंट्रल (१२६१९) मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा सोमवारी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी ते कुडाळ विभागादरम्यान ३० मिनिटांसाठी नियमित केला जाणार आहे. वास्को द गामा - यशवंतपूर जंक्शन (१७३१०) ही गाडी ३० मिनिटे उशिराने धावणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

Web Title: Two hour megablock today on Konkan railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.