जयंत धुळप, अलिबागसामान्य, गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतमजूर, शेतकरी यांचे जीवनमान सुधारावे व त्यांना जीवनात सुरक्षितता लाभावी म्हणून केंद्र शासनाने गेल्या १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभरात लागू केलेल्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेंतर्गत दोन लाख ४४ हजार २३५ लाभधारकांची नोंदणी झाली आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे काम विविध राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून करण्यात येत असून, या योजनेच्या यशस्वितेसाठी सर्व बँका सक्रिय सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ७० हजार ५५, बँक आॅफ इंडियाने ४२ हजार २६९, बँक आॅफ महाराष्ट्रने २५ हजार ३४६, स्टेट बँक आॅफ इंडियाने २४ हजार १५५, देना बँकेने १८ हजार २७३, आयडीबीआय बँकने १४ हजार २२५, युनियन बँक आॅफ इंडियाने ८ हजार ८८६ , बँक आॅफ बडोदाने ९ हजार १९४, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ४ हजार ०५०, सिंडिकेट बँकने ३ हजार ६३०, इंडियन ओवरसिस बँकेने ४ हजार १५, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सने ३ हजार ४५३, कॉर्पोरेशन बँकने २ हजार ७७३, अॅÞक्सिस बँकेने २ हजार ५०९, आयसीआयसीआय बँकेने १ हजार ८२०, कॅनरा बँकेने १ हजार ५५१, पंजाब नॅशनल बँकेने १ हजार ७९६, स्टेट बँक आॅफ हैदराबादने १ हजार ४१३, पंजाब अॅण्ड सिंध बँकेने १ हजार ३२१, युको बँकने ८९०, विजया बँकेने ५४७, एचडीएफसी बँकेने ५००, फेडरल बँकेने ३७८, रत्नाकर बँकेने २७, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १ हजार १५९ असे जिल्ह्यात एकूण २ लाख ४४ हजार २३५ लाभधारक पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत सहभागी झाले आहेत.सामान्य नागरिकांना सुरक्षा मिळावी, एखाद्या अपघाताने त्यांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये, त्यांना मदत मिळून त्यांचे जीवन सावरावे यासाठी पंतप्रधान सुरक्षा योजना राबविण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. केवळ १२ रुपये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे. मात्र दरवर्षी नूतनीकरण आवश्यक राहणार आहे. बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. १८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीला आधार क्रमांकाद्वारे योजनेत सहभागी होता येते. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाऊन, पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मेपर्यंत देणे आवश्यक राहणार आहे.
योजनेचे दोन लाख लाभधारक
By admin | Published: October 17, 2015 1:58 AM