नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील सायन-पनवेल महामार्गावरील एलीपी ब्रीज, नेरूळ येथील पुणे वाहिनीवर काँक्रिटीकरणाचे काम दि. १९ एप्रिल २०२३ पासून सुरू होणार असून, ते सुमारे एक महिना चालणार आहे. यामुळे या पुलावरील पुणेकडे जाणाऱ्या वाहिनीची एक लेन वाहनांसाठी खुली असणार असून, इतर दोन लेन कामासाठी बंद राहणार असल्याचे नवी मुंबई पोलिसांनी कळविली आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील एक व्यस्त महामार्ग म्हणून सायन-पनवेल महामार्गाकडे पाहिले जाते. महानगरातून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण भारतासह जेएनपीटी, उरण-पनवेलकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा महत्त्वाचा मार्ग असून, त्यावरील नेरूळचा एलपी ब्रीज हा महत्त्वाचा आहे. या आता त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून, हे काम एक महिना चालणार आहे. याळे पुण्याकडे जाणाऱ्या दोन लेन बंद ठेवण्यात आल्या आहेत. एकाच लेनवरून वाहतूक सुरू राहणार आहे. परिणामी मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे. यामुळे त्रासापासून वाचण्यासाठी पाच बीचमार्गे बेलापूर जंक्शनवरून पुणे गाठावे, असे आवाहन करण्यात आले आहे.