पनवेल : कासाडी नदीचे दूषित पाणी प्यायल्याने आणखी 2 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 5 ऑगस्ट रोजी 12 बकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत तळोजा एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली होती. या बकऱ्या नावडे येथील शेतकऱ्याच्या होत्या.
तळोजा येथील कारखानदार मोठ्या प्रमाणात दूषित पाणीनदीत सोडत असल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला होता. बुध्या अनंता म्हात्रे या शेतकऱ्याच्या या बकऱ्या आहेत.12 बकऱ्याचा मृत्यूचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच पुन्हा 2 बकऱ्या मृत्यू झाल्याने तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणाचा विषय चांगलाच गाजला आहे.15 पैकी 14 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने म्हात्रे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.तसेच नदीत प्रदूषित पाणी सोडनाऱ्यावर कारवाईची देखील मागणी करण्यात येत आहे.