शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

अपघाताचा बनाव करून लुटणारी दुकली अटकेत

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 31, 2023 3:39 PM

दोघांचा शोध सुरु: चालकांना धमकावून लुटायचे पैसे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : भरधाव वाहनांना स्वतःहून कट मारून अपघातामध्ये बचावल्याचा बनाव करून चालकांना लुटणाऱ्या दोघांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही कोपर खैरणेचे राहणारे असून त्यांच्या इतर दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांनी शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारे अनेकांना लुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ठाणे बेलापूर मार्गावर दिघा येथे एका मोटारसायकलस्वाराला लुटल्याची घटना घडली होती. अज्ञात दोघांनी त्याच्या मोटरसायकलला कट मारून अडवले होते. यांनतर त्याला मारण्याची धमकी देऊन त्याच्या मोबाईलमधील फोन पे मधून २० हजार रुपये एका खात्यात पाठवण्यात आले होते. यासंदर्भात रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली असता वरिष्ठ निरीक्षक सुधी पाटील यांनी उपनिरीक्षक दीपक शेळके यांचे पथक केले होते. या पथकाने सदर बँक खातेधारक व त्याच्या सहकाऱ्यांची माहिती मिळवली असता लुटमारी करणाऱ्या टोळीची माहिती हाती लागली. त्याद्वारे सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली आहे. शाहरुख खान (२२) व अश्रफ खान (२२) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही कोपर खैरणे सेक्टर १९ मध्ये राहणारे आहेत. तर अण्णा पुजारी व विनय धनके या त्यांच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

हे सर्वजण मोटारसायकलवरून शहरात फिरत असताना एखाद्याला जाणीवपूर्वक कट मारायचे. त्यानंतर सदर चालकासोबत वाद घालून त्यांच्याकडून रोकड अथवा ऑनलाईन पैसे खात्यात घ्यायचे. अशाप्रकारे त्यांनी केलेले दोन गुन्हे समोर आले असून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी एपीएमसी पोलिसांनी अशाच प्रकारे चालकांना लुटणाऱ्या बंटी बबलीला अटक केली होती. त्यानंतर दुसरी टोळी समोर आल्याने शहरात अपघाताचा बनाव करून लुटमाऱ्या करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे समोर आले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी