‘त्या’ दोघा संशयितांचा अद्यापही सुगावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:03 AM2018-04-25T05:03:43+5:302018-04-25T05:03:43+5:30

आठपेक्षा अधिक गुन्हे : फूस लावून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

The two 'suspects' still do not know | ‘त्या’ दोघा संशयितांचा अद्यापही सुगावा नाही

‘त्या’ दोघा संशयितांचा अद्यापही सुगावा नाही

Next

नवी मुंबई : फूस लावून अल्पवयीन मुलींना एकांतामध्ये नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांचा शोध नवी मुंबईसह मुंबई व ठाणे पोलीस करत आहेत. अवघ्या एमएमआरडीए क्षेत्रात त्या दोघांवर आठपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मात्र, एका वर्षापासून पोलीस त्यांच्या शोधात असतानाही त्यांची कसलीच माहिती मिळत नसल्याने बक्षिसाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुली एकट्या असल्याची संधी साधून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना गतवर्षात शहरात घडल्या आहेत. त्यापैकी काही घटनांमध्ये दोघा संशयितांचे साम्य असल्याचे तपासात समोर आले आहे. वडिलांनी अथवा परिचयाच्या नातेवाइकाने बोलावले असल्याचे सांगून अल्पवयीन मुलींना ते एकांतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटनांच्या तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून दोघा संशयितांचे छायचित्र मिळाले आहे. यानुसार त्यांच्याविरोधात वाशी, सानपाडा, नेरुळ, कोपरखैरणे, सानपाडा तसेच खारघर पोलीसठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, ते हाती न लागल्याने त्यांच्यावर दहा हजारांचे बक्षीस घोषित करून नवी मुंबई पोलिसांनी त्यांचे छायचित्र ठाणे, मुंबई पोलिसांनाही पाठवले होते. या दरम्यान त्या ठिकाणीही या दोघांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. तेव्हापासून तीनही आयुक्तालयातील पोलीस या दोघा संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र, वर्ष उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. अखेर नवी मुंबई पोलिसांनी या दोघा संशयितांची माहिती देणाºयांच्या बक्षिसात वाढ करून २५ हजार इतके केले आहे. शासनाद्वारे नुकतीच १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाºयाला फाशीची शिक्षा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक अल्पवयीन मुलींना वासनेचे बळी पाडणाºया या दोघांच्या शोधात नवी मुंबई, ठाणे तसेच मुंबई पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The two 'suspects' still do not know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.