नकली नोटा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक

By admin | Published: August 6, 2015 12:39 AM2015-08-06T00:39:37+5:302015-08-06T00:39:37+5:30

हजार रुपयांच्या बनावट नोटा एका स्वीट मार्टमध्ये वटवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन महिलांना पकडल्याची घटना पनवेल शहरात मंगळवारी घडली आहे

Two women arrested for fake currency were arrested | नकली नोटा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक

नकली नोटा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक

Next

पनवेल : हजार रुपयांच्या बनावट नोटा एका स्वीट मार्टमध्ये वटवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन महिलांना पकडल्याची घटना पनवेल शहरात मंगळवारी घडली आहे.
शहरातील एका स्वीट मार्टमध्ये पेढे खरेदी करण्यासाठी सोनाली खातून व सुमेश खातून या दोन महिला दुकानात आल्या होत्या. यावेळी त्यांनी १०० रुपयांचे पेढे घेऊन त्यांच्याकडील हजार रुपयाची बनावट नोट दुकानदाराला दिली. दुकानदाराने देखील उर्वरित पैसे या महिलांना परत दिले. मात्र नोट बनावट असल्याचे लक्षात येताच दुकानदाराने पनवेल पोलिसांना कळवले.
त्यानुसार गस्त घालणाऱ्या पोलिसांनी या दोन महिलांना पकडले. अधिक तपासात सदर महिलांकडे हजार रुपयांच्या चार बनावट नोटा आढळून आल्या आहेत. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विभीषण गव्हाणे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two women arrested for fake currency were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.