भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 03:38 AM2018-03-25T03:38:25+5:302018-03-25T03:38:25+5:30

भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालकासह दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पामबीच मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

 Two youths died in a major accident | भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू

भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू

Next

पनवेल : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालकासह दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पामबीच मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. कारची अतिवेगात दुचाकीला धडक बसल्याने पलटी होवून हा भीषण अपघात झाला.
पामबीच मार्गावर एनआरआय वसाहतीसमोरील सिग्नललगत शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. वाशी येथे नोकरी करणारा रुबेन शिंदे (२५) हा मोटारसायकलने कळंबोली येथील राहत्या घराच्या दिशेने चालला होता. तो एनआरआय वसाहतीसमोरील सिग्नलपासून पुढे जाताच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने त्याला धडक दिली. यावेळी कार अतिशय वेगात असल्याने शिंदे हा दुचाकीसह काही अंतरापर्यंत फरफटत गेला, तर दुचाकीला धडकल्यानंतर कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून अनेक पलट्या खावून पडली. या भीषण अपघातामध्ये कारमधील राहुल पाटील (३७) याच्यासह दुचाकी चालक रुबेन शिंदे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. राहुल पाटील याने अतिवेगात कार पळवल्याने हा भीषण अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींकडून अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु दोघांनाही रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राहुल पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील व पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचे सख्खे चुलत बंधू होते. पामबीच मार्गावर यापूर्वी देखील वेगमर्यादा तोडल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतरही रात्री कारचालकांच्या बेशिस्तीमुळे असे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title:  Two youths died in a major accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात