सिडको विरोधात उलवेवासीय आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:06 AM2018-04-25T05:06:07+5:302018-04-25T05:06:07+5:30

उलवे परिसराचा विकास अर्धवट सोडून सिडकोने तिथल्या रहिवाशांना वाºयावर सोडले आहे

Udaoya aggressor against CIDCO | सिडको विरोधात उलवेवासीय आक्रमक

सिडको विरोधात उलवेवासीय आक्रमक

Next

नवी मुंबई : सिडको विरोधात उलवेवासीयांनी पुकारलेल्या आंदोलनाला विविध संघटनांकडून पाठिंबा वाढत चालला आहे. तसेच आंदोलकांच्या इशाऱ्यामुळे मंगळवारी भरणारा आठवडा बाजारही इतरत्र हलवण्यात आला. मात्र, त्यावर कारवाई न झाल्यामुळे त्यामध्ये सिडको अधिकारी व कर्मचाºयांचे हात ओले होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
उलवे परिसराचा विकास अर्धवट सोडून सिडकोने तिथल्या रहिवाशांना वाºयावर सोडले आहे. नागरी सुविधांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत चालले आहे. पदपथदेखील त्यांच्याकडून व्यापले जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, अनेक तक्रारी करूनही सिडकोने उलवेवासीयांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप होत आहे. तर अनेकदा अनधिकृत फेरीवाल्यांना पाठीशी घालून इतर व्यावसायिकांवर मार्जिनलच्या नावाखाली कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे अतिक्रमण विरोधी कारवायांमध्ये अर्थकारण असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून होत आहे. परिणामी, उलवे परिसरातील रहिवासी व व्यावसायिक यांनी सिडको विरोधात आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. सोमवारपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, आंदोलनाच्या दुसºया दिवशी विविध संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला. संजिवनी महिला मंडळासह, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, मनसे उलवे शहर अध्यक्ष राहुल पाटील, भाजपाचे पंडित म्हात्रे, अमर म्हात्रे, बहाळचे माजी सरपंच बाळाराम पाटील, उपसरपंच रामदास नाईक आदीनी आंदोलकांची भेट घेतली, तसेच समस्या निकाली काढण्यासाठी सिडको विरोधात सुरू असलेल्या लढ्यात सहभाग घेतला.
उलवेवासीयांचे हे ठिय्या आंदोलन सुरू असतानाच मंगळवारी त्या ठिकाणी आठवडे बाजार भरेल की नाही, यावरून वातावरण तापले होते. या दरम्यान आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये, याकरिता पोलिसांनी त्यांना नोटिसादेखील बजावल्या. अखेर आंदोलकांच्या इशाºयामुळे खेळाच्या मैदानात आठवडे बाजार भरला नाही. मात्र, संध्याकाळ होताच त्यापासून काही अंतरावरील दुसºया भूखंडावर हा आठवडे बाजार भरल्याचे पाहायला मिळाल्याचा संताप रहिवासी क्रिशनन पाटील व डॉ. आरती धुमाळ यांनी व्यक्त केला. तर रहिवाशांचा विरोध असतानाही ठिकाण बदलते. मात्र, आठवडे बाजार भरतोच यावरून अनधिकृत फेरीवाल्यांकडून सिडको अधिकाºयांचे हात ओले होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. जोपर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यातून उलवेवासीयांची सुटका होत नाही व मूलभूत सुविधांमध्ये सुधार होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Web Title: Udaoya aggressor against CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको